शाळा सुरु करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय, अन्य राज्यातील स्थितीवरही लक्ष : बच्चू कडू
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतची स्थिती, भाजप कडून होणार यंत्रणांचा वापर आणि विधान परिषदेच्या बारा जागांबद्दल राज्यपालांची भूमिका यासंदर्भात भाष्य केलं.
नागपूर: महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतची स्थिती, भाजप कडून होणार यंत्रणांचा वापर आणि विधान परिषदेच्या बारा जागांबद्दल राज्यपालांची भूमिका यासंदर्भात भाष्य केलं. शाळा सुरु करण्यासंदर्भा राज्य सरकारचा विचार सुरु असून त्यासंदर्भात लवकरचं निर्णय होईल, असं बच्चू कडू म्हणाले.
शाळा कधी सुरु होणार?
महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे, मात्र इतर राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असंही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. शाळा सुरु करण्यासाठी टास्क फोर्सच्या सूचना लक्षात घेऊन एसओपीत बदल केल्यानंतर नवी कार्यप्रणाली जाहीर केली जाणार आहे.
भाजपकडून यंत्रणांचा वापर
काल सीबीआय ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला कुठलीही नोटीस न देता ताब्यात घेतलं. त्यामुळं भाजप ईडी आणि सीबीआयचा वापर करत असल्याचं स्पष्ट झालंय, असाही आरोप बच्चू कडू यांनी केला.
राज्यपालांच्या भूमिकेची चौकशी व्हावी
महाविकास आघाडी सरकारच्यावतीनं नोव्हेंबर 2020 ला विधान परिषदेच्या 12 जागांसाठी नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. याविषयी बोलताना बच्चू कडू यांनी राज्यापालांवर निशाणा साधला आहे. 12 आमदारांच्या नियुक्ती वर राज्यपाल निर्णय घेत नाही, त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे, त्यामुळं त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलीय.
मुख्यमंत्री आणि राज्यपाल भेटीत काय घडलं?
अजित पवार म्हणाले की, “मी, मुख्यमंत्री महोदय, बाळासाहेब थोरात, आणि राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांना भेटलो. प्रोटोकॉलनुसार राज्यपालांची भेट घेतली जाते. त्यासाठी आम्ही भेटलो. पावसानं राज्यात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि राज्यातील कोरोनाची स्थिती याबाबत चर्चा केली. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत प्रश्न केला असता, अजित पवार म्हणाले की, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतचा ठराव हा कॅबिनेटने केला होता. परंतु त्यानंतर पुढची कार्यवाही झालेली नाही. म्हणून याबाबत विनंती करण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो. त्याबद्दल लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल, असे सांगून आम्ही राज्यपालांना कार्यवाही करण्याबाबत विनंती केली.
12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?
काँग्रेस
1) सचिन सावंत 2) रजनी पाटील 3) मुजफ्फर हुसैन 4) अनिरुद्ध वनकर
राष्ट्रवादी काँग्रेस
1) एकनाथ खडसे 2) राजू शेट्टी 3) यशपाल भिंगे 4) आनंद शिंदे
शिवसेना
1) उर्मिला मातोंडकर 2) नितीन बानगुडे पाटील 3) विजय करंजकर 4) चंद्रकांत रघुवंशी
इतर बातम्या:
Harshwardhan Jadhav | कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा तहसील कार्यालयावर मोर्चा
Ajit Pawar | निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीची नेमणूक केली जात नाही : अजित पवार
Bacchu Kadu said school reopen decision will taken in next two days but study other state corona situation