Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिमंडळ विस्ताराची मी बातमीच पाहत नाही; विस्ताराच्या निव्वळ चर्चांमुळे बच्चू कडू वैतागले

संभाजी भिडे हा राष्ट्रद्रोही माणूस आहे. त्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. भिडे यांना असेल तिथून उचलून आत टाकलं पाहिजे. जिथे स्वतः मोदीजी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालेत, त्या साईबाबांचा अपमान या माणसाने केलेला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराची मी बातमीच पाहत नाही; विस्ताराच्या निव्वळ चर्चांमुळे बच्चू कडू वैतागले
bacchu kaduImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 11:47 AM

नागपूर | 2 ऑगस्ट 2023 : गेल्या वर्षभरापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अजूनही विस्तार होत नाहीयेत. मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेक आमदार डोळे लावून आहेत. शिंदे गट आणि भाजपचे मित्र पक्षही या विस्ताराची वाट पाहून आहेत. जेव्हा जेव्हा विस्ताराची चर्चा होते, तेव्हा तेव्हा या इच्छुकांकडून सेटिंग आणि लॉबिंगही केली गेली. पण प्रत्येकवेळी विस्ताराची चर्चा ही चर्चाच ठरली. राष्ट्रवादीचा एक गट सरकारसोबत आला आणि सत्तेत सहभागीही झाला. पण इच्छुकांना अजून सत्तेची दारं उघडली नाहीत. त्यामुळे अनेकजण वैतागले आहेत. प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडूही विस्तार होत नसल्याने उद्विग्न झाले आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. मी विस्ताराची न्यूज आता पाहत नाही, असा वैताग बच्चू कडू यांनी व्यक्त केला. प्रहारने मंत्रीपदाची मागणी केली आहे. पण मी मंत्रिपद घेणार नाही. राजकुमारसाठी मंत्रिपद ठेवणार आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

भिडे यांचं विधान निंदनीय

यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्या विधानाचा निषेध नोंदवला. कुठल्याही महापुरुषांबाबत वक्तव्य करणं योग्य नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल विधान करताना पुरावे दिले होते. भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल जे विधान केलं ते निंदनीय आहे. कोणीही असू द्या, भिडे गुरुजी असो की कुणी असं बोललं तर त्यांना आडवं घेतलं पाहिजे. भिडे गुरुजी स्वातंत्र्याबद्दल संशय निर्माण करत आहेत, स्वातंत्र्याबाबतचं त्यांचं मत चुकीचं आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

काँग्रेसनेही तेच केलं

निधी वाटपात भेदभाव झाला असा काँग्रेस आरोप करते. काँग्रेसची सत्ता होती तेव्हा काय होतं? तेव्हाही तसंच होतं. जशी करणी तसं फळ मिळत असतं, असा टोला त्यांनी लगावला. प्रश्न सोडवायला केवळ अधिवेशनंच मार्ग नाही. कॅबिनेटही असते. सरकार रोज प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असते, असंही त्यांनी सांगितलं.

असेल तिथे अटक करा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. संभाजी भिडे हा राष्ट्रद्रोही माणूस आहे. त्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. भिडे यांना असेल तिथून उचलून आत टाकलं पाहिजे. जिथे स्वतः मोदीजी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालेत, त्या साईबाबांचा अपमान या माणसाने केलेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी असा आपमन सहन करणार नाही अशी भूमिका मांडली होती. आता यांना तुरुंगात कधी टाकणार असा माझा प्रश्न आहे. नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

त्यांचं मूळ भाजपला पोषक

टोपणनाव घालून मराठी पोरांना भुरळ घालण्याचा प्रयत्न संभाजी भिडे करत आहे. त्यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा, समजातंतेढ निर्माण करणं ही त्याची उद्दिष्टं आहेत, हे स्पष्ट दिसतंय. यांचं मूळ कितीही नाकारलं तरी भाजपला पोषक आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार.
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल..
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल...
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.