Bachhu Kadu : 4 नोव्हेंबरला करणार मोठा स्फोट; विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडू कुणाचं करणार एन्काऊंटर?

Bachhu Kadu Big Statement : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. महायुतीशी असलेले सख्य कमी झाल्यानंतर त्यांनी पलटवार केला आहे. तर महाविकास आघाडीविरोधात पण मोर्चा उघडला आहे. राज्यात परिवर्तनासाठी त्यांनी तिसरी आघाडी उघडली आहे. काय म्हणाले बच्चू कडू?

Bachhu Kadu : 4 नोव्हेंबरला करणार मोठा स्फोट; विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडू कुणाचं करणार एन्काऊंटर?
बच्चू कडू यांचे मोठे विधान
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 10:53 AM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग हाती घेतला आहे. जनता महायुती आणि महाविकास आघाडीला कंटाळली असून त्यांना नवीन पर्याय देण्याचा त्यांचा दावा आहे. त्यापूर्वी त्यांची विधान चर्चेत आहेत. तिसरी आघाडी राज्यात सक्षम पर्याय ठरणार का हे लवकरच समोर येईल. त्यापूर्वी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांविरोधात मोर्चा उघडला आहे. हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे ते म्हणाले. 4 नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल असे ते म्हणाले.

जनता या सत्ताधारी-विरोधकांना कंटाळली

जनता, महायुती- महाविकास आघाडीला कंटाळली आहे. या दोघांच्या जागा वाटपमध्ये तिढा आहे. भाजप काँग्रेस एकच आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर केली. तिसऱ्या आघाडीच्या निमित्ताने जनता आपल्या पाठीशी राहण्याचा दावा त्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

आघाडी आणि युती दोघांचाही एन्काऊंटर करणार

उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे. 4 नोव्हेंबरला सगळं स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार आहे. अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल, असे ते म्हणाले. माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझा विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजन तेली किंवा त्याबद्दल मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याची न्यूज तुम्ही चालवली, कशी झाली मला माहिती नाही, मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो. आम्ही आघाडी आणि युती दोघांचाही एन्काऊंटर करणार असे ते म्हणाले.

चांगले उमेदवार, मतदार संघ आमच्याकडे

निवडणुकीत आम्ही मुद्द्यावर लोकांना घेऊन जाऊ. 4 तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट होईल, 4 नोव्हेंबरला स्पष्ट होईल, महाशक्ती हा स्फोट करणार आहे. चांगले उमेदवार आणि चांगले मतदार संघ आमच्याकडे आलेले दिसतील. युती आणि आघाडी, त्या दोघांना पाहिले पडायचे, असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील संबंधात माझे काही बोलणे झाले नाही. जसे इतर पडतात तसे तेही पडतील, असे ते म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.