बच्चू कडू यांची विधानसभा निवडणुकीची तयारी; …तर इतक्या जागा लढविण्याचा निर्धार
दिव्यांग मंत्रालयाचं काम सुरु केलं. मला चिंता नाही. दिव्यांग मंत्रालयाचं काम सुरु केलंय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिव्यांग मंत्रालयाच्या बैठका घ्या. विस्तारापूर्वीच बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालयाची सूत्र हाती घेतली.
नागपूर : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप – शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच. अन्यथा १५ विधानसभा जागा लढवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. युतीसाठी आग्रह करु, पण, युती नाही तर स्वतंत्र लढणार असंही बच्चू कडू म्हणाले. नागपुरात ते बोलत होते. राज्यपाल शपथविधीच्या पत्रिका छापायला गेल्या आणि मंत्रिमंडळ विस्तार होत आहे अशी चर्चा मंत्रालयात रंगल्या. १८ -१९ तारखेला शपथविधी आहे. अशा प्रकारे आमदारांचे एक दुसऱ्याला फोन सुरु झाले. निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या निर्णयावर मंत्रिमंडळ विस्तार थांबलाय.
२० मंत्री करायचेत रांगेत ५०
विस्तार केल्यावर भूकंप होईल, अशी स्थिती नाही. विस्तार झाल्यावर कुणी बाहेर जाणार नाही. उलट इकडेच येतील. मंत्री मंडळ विस्ताराचा विषय गंमतीचा झालाय. २० मंत्री करायचे आहे तर ५० लोक रांगेत आहे. आता विस्तार आहे म्हणून अर्धे लोक मुंबईतच असतात. असंच अनेकांच्या डोक्यात आहे.
दिव्यांग विभागाच्या बैठका सुरू
बच्चू कडू म्हणाले, दिव्यांग मंत्रालयाचं काम सुरु केलं. मला चिंता नाही. दिव्यांग मंत्रालयाचं काम सुरु केलंय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिव्यांग मंत्रालयाच्या बैठका घ्या. विस्तारापूर्वीच बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालयाची सूत्र हाती घेतली. नका मंत्रीपद देऊ. जिल्ह्यात दिव्यांग विभागाच्या बैठका घेण्याचा अधिकार द्या, असंही बच्चू कडू यांनी म्हंटलं.
म्हणून अजित दादा शपथ घ्यायला गेले
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, पवार साहेब मजबूत आहेत. मग त्यांच्याच परिवारातील व्यक्ती पहाटेचा शपथ घ्यायला जातो. हे त्यांना माहीत नसेल का? पवार साहेब यांना माहीत असेल, त्यांची हिरवी झेंडी असेल म्हणून अजित दादा शपथ घ्यायला गेले असतील.
पवार साहेब माहीत नव्हतं तर मग बंड करुनही अजित दादा यांना उपमुख्यमंत्रीपद का दिलं, असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला. बंड केलं त्यांना उपमुख्यमंत्री मग प्रामाणिक कार्यकर्त्यांचं काय?
नाना पटोले यांनी बंड केलं. काँग्रेस सोडून भाजप आणि पुन्हा काँग्रेस आता त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं. पुणे जिल्हा पोटनिवडणुकीत भाजप विजयी होणार आहे. आमचा पाठिंबा आहे. भाजप निवडून येईल अशी खेळी केलीय, असंही बच्चू कडू यांनी म्हंटलं.