Video : Jwala Dhote | बावनकुळेंना पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊ देता, मला का नाही, ज्वाला धोटेंचा पोलिसांना सवाल

मला सामाजिक प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी परवानगी का नाकारली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या मुठभर लोकांसाठी उपराजधानीत वेगळा कायदा आणि सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा आहे का, असंही त्या म्हणाल्या. केंद्राच्या जोरावर हे मस्तावले आहेत, अशीही टीका ज्वाला धोटे यांनी केली.

Video : Jwala Dhote | बावनकुळेंना पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊ देता, मला का नाही, ज्वाला धोटेंचा पोलिसांना सवाल
ज्वाला धोटेंचा पोलिसांना सवाल
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 4:23 PM

नागपूर : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस मुख्यालयात पत्रपरिषद कशी घेतली, असा सवाल उपस्थित करत आम्हालाही इथे पत्रपरिषद घेऊ द्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी केली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद (conference ) घेतल्याचा आरोप ज्वाला धोटे (Jwala Dhote) यांनी केला आहे. पोलीस मुख्यालय ही पत्रपरिषद घेण्याची जागा आहे काय? तसे असेल तर मलाही घेऊ द्या, अशी मागणी त्यांनी केली. ज्वाला धोटे या आज पोलीस मुख्यालयात (Office of the Commissioner of Police) गेल्या होत्या. मात्र आज मुख्यालय बंद असल्याने त्यांना बाहेरच रोखण्यात आले. त्यामुळे ज्वाला यांनी संताप व्यक्त केलाय. सोमवारपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही तर पोलीस मुख्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका ज्वाला धोटे यांनी घेतली आहे.

पाहा व्हिडीओ

यापूर्वीही पोलीस आयुक्तांविरोधात भूमिका

या संपूर्ण प्रकरणात मात्र पोलिसांने बोलणे टाळले. आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर पोलीस आयुक्त यांच्या विरोधात ज्वाला धोटे यांनी या आधी सुद्धा वेगवेगळ्या भूमिका घेत विरोध प्रदर्शन केलं होतं. नागपुरातील रेड लाईट एरियामधील वेश्याव्यवसाय पोलिसांनी बंद केला होता. त्यावेळी सुद्धा ज्वाला धोटे यांनी मोठं आंदोलन करत पोलिसांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी ज्वाला धोटे या राष्ट्रवादी काँगेसमध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. मात्र त्यांचे सामाजिक विषयावरील आंदोलन सुरूच आहेत.

हे सुद्धा वाचा

मला हात लावायचा नाही

ज्वाला धोटे यांना महिला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण, मला हात लावायचा नाही. असा सज्जड दम त्यांनी महिला पोलिसांना दिला. भाजपचे नेते पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आले होते. तेव्हा पोलीस आयुक्तांनी स्वतःच दालन सोडलं. काँफरन्स हॉलमध्ये येऊन पोलीस आयुक्तांनी निवेदन घेतलं. प्रेसशी संबोधन केलं. त्यांना पोलिसांनी संबोधन करण्यासाठी परवानगी दिली गेली. मग मला का नाही, असा सवाल ज्वाला धोटे यांनी उपस्थित केला. त्यांना परवानगी मिळाली. मग, मला सामाजिक प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी परवानगी का नाकारली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या मुठभर लोकांसाठी उपराजधानीत वेगळा कायदा आणि सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा आहे का, असंही त्या म्हणाल्या. केंद्राच्या जोरावर हे मस्तावले आहेत, अशीही टीका ज्वाला धोटे यांनी केली.

वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.