Bhandara, Gondia ZP Election | प्रचार तोफा थंडावल्या, उद्या छुपा प्रचार, 21 ला होणार मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

ओबीसी आरक्षण स्थगित झालेल्या भंडारा जिल्ह्यातील 28 डिसेंबर रोजी याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. नामनिदेशन मागे घेण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी आहे. 18 जानेवारीला मतदान होणार आहे. 19 जानेवारीला मतमोजणी होईल.

Bhandara, Gondia ZP Election | प्रचार तोफा थंडावल्या, उद्या छुपा प्रचार, 21 ला होणार मतदान, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी जाऊन प्रचारावर भर देताना राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन व कार्यकर्ते.
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 7:34 PM

नागपूर : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे मतदान 21 डिसेंबर रोजी होणार आहे. भंडाऱ्यात 7 पंचायत समितींसह तीन नगर पंचायत निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद उमेदवाराच्या प्रचार तोफा रविवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. जिल्हा प्रशासनानं निवडणूक संबंधानं संपूर्ण तयारी केली आहे. भंडारा जिल्हा परिषदेचा 39 जागांकरिता एकूण 245 उमेदवार रिंगणात आहेत. 79 पंचायत समिती निवडणुकीकरिता एकूण 417 उमेदवार रिंगणात आहेत.

आठ लाख मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

भंडारा जिल्ह्यात एकूण1322 मतदान केंद्र आहेत. 4365 मतदान अधिकारी तसेच 1455 पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 7 लाख 98 हजार 795 मतदार आहेत. 21 तारखेला ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भंडारा जिल्हा परिषदेचा 39 जागांकरिता एकूण 245 उमेदवार रिंगणात आहेत. 79 पंचायत समिती निवडणुकी करिता एकूण 417 उमेदवार रिंगणात आहेत. शिवाय जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील नगर पंचायतीमध्ये लाखनी नगर पंचायत 63 उमेदवार, लाखांदूर नगर पंचायत 47 उमेदवार व मोहाडी नगरपंचायतीमध्ये 58 उमेदवार आपले भाग्य आजमावणार आहेत. तीन नगरपंचायतींच्या 12 प्रभागांची निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. 22 हजार 896 मतदार 168 उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहेत.

गोंदियात 693 उमेदवार निवडणूक रिंगणार

गोंदिया जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गाच्या जागा आता खुल्या करून त्यासाठी 18 जानेवारीला निवडणूक होणार आहे. तर उर्वरित जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. यात जिल्हा परिषदेच्या 43, पंचायत समितीच्या 86 आणि नगरपंचायतच्या 45 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यात जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीचे एकूण 693 उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत. तर नगरपंचायतच्या 45 जागांसाठी 293 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

रविवार ठरला प्रचाराचा सुपर संडे

रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून जाहीर प्रचार बंद करावा लागला. त्यामुळं प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभा, रॅली, रोड शोच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. तरूण पिढी सोशल मीडियावर सक्रिय आहे. शिवाय उमेदवारांना चार-पाचच दिवसांचा कालावधी मिळाला. सर्व उमेदवारांपर्यंत पोहचणे शक्य नव्हते. त्यामुळं बहुतेक सर्वच उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर केला. आपला उमेदवार कसा अधिक सरस आहे, हे सांगण्याच प्रयत्न या माध्यमातून होत होता.

स्थगित जागांसाठी मतदान 18 जानेवारीला

ओबीसी आरक्षण स्थगित झालेल्या भंडारा जिल्ह्यातील 28 डिसेंबर रोजी याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. नामनिदेशन मागे घेण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी आहे. 18 जानेवारीला मतदान होणार आहे. 19 जानेवारीला मतमोजणी होईल. तोपर्यंत म्हणजे 21 डिसेंबरला मतदान झाल्यामुळं निकालासाठी उमेदवारांना महिन्याभराची वाट पाहावी लागणार आहे.

Gondia murder | भाऊच ठरला कर्दनकाळ, उपचाराला खर्च लागतो म्हणून संपविले, मतिमंद भावाची गळा दाबून हत्या!

आघाडी सरकार हरवलं, शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ; फडणवीसांचा घणाघात

Gondia ZP Election | आमच्यावेळी प्रचाराला आले नव्हते, दोन माजी आमदारांची नाराजी; उमेदवारांच्या प्रचारासह फडणवीसांनी दिला दोन्ही नेत्यांना धीर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.