पार्ल्यापासून वांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते पाहाच, शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा; ठाकरे गट अडचणीत येणार?

कर्नाटकाने आगाऊपणा करू नये. जे काही शांततेत चाललं आहे, ते सुरू ठेवावं. सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे. जे होईल त्याला आम्ही सामोरे जाणार आहोत.

पार्ल्यापासून वांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते पाहाच, शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा; ठाकरे गट अडचणीत येणार?
पार्ल्यापासून वांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते पाहाच, शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा; ठाकरे गट अडचणीत येणार? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 9:16 AM

नागपूर: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नागपुरात येऊन राजकीय बॉम्बस्फोट करणार असल्याचा दावा केला होता. मात्र, गेल्या तीन दिवसात राऊत यांनी एकही गौप्यस्फोट न केल्याने आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाची खिल्ली उडवली जात आहे. स्फोट करण्यासाठी शिवसेनेकडे दारुगोळा शिल्लक नाहीये. राऊत त्या दिवशी बोलून फसले, अशी टीका करतानाच आता मी पार्ल्यापासून वांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते पाहाच, असा इशारा शिंदे गटाचे नेते भरतशेठ गोगावले यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्या दाव्याचा समाचार घेतला आहे. आम्ही बॉम्बशोधक पथक आणलंय. त्यामुळे स्फोट होऊ शकला नाही, असं उदय सामंत म्हणाले आहेत. मुंबईहून येऊन जर ठाकरे गटाचे नेते काहीच बोलू शकत नसतील तर त्यांच्या स्फोटातला दारुगोळा संपलाय हे समजून घ्या, असा चिमटा भरतशेठ गोगावले यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

माझ्याकडे स्फोट करण्यासारखी प्रकरणं आहेत. त्यामुळे मी सभागृहात सर्व विषय मांडणार आहे. पार्ल्यापासून वांद्र्यापर्यंत कसे हादरे देतो ते तुम्ही बघाच, असा इशाराच गोगावले यांनी दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

त्यांनी केलेल्या चुका माझ्याकडे आहेत. सभागृहात विषय मांडल्यानंतर वस्तुस्थिती समजेल. येत्या दोन दिवसात ही वस्तुस्थिती समोर येईल. त्यानंतर तुम्हाला पार्ल्यापासून वांद्र्यापर्यंत फटाके वाजताना दिसतील, असा दावाही त्यांनी केला.

ठाकरे गटाचे अनेक घोटाळे आहेत. त्याची एक झलक त्यांना पाहायला मिळणार आहे, असंही ते म्हणाले. त्यामुळे गोगावले आज सभागृहात काय स्फोट करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यावेळी त्यांनी सीमावादावरही भाष्य केलं. मुंबई कुणाच्या बापाची नाहीये. महाराष्ट्रासाठी 105 जणांनी हौतात्म्य दिलं आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जास्त बोलू नये. एक इंचच काय अर्धा इंचही जमीन कर्नाटकाला देणार नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आहे. सीमाभागातील गावांना सुविधा देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कर्नाटकाने आगाऊपणा करू नये. जे काही शांततेत चाललं आहे, ते सुरू ठेवावं. सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे. जे होईल त्याला आम्ही सामोरे जाणार आहोत. मुंबईचं सोडा पण कर्नाटकाच्या नेत्यांनी कोणतीही भाषा करू नये. मुंबई तर लांब राहिली, त्यांनी साधं कोल्हापूरचंही नाव घेऊ नये, असा इशाराच त्यांनी दिला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.