आमच्या मुलांना कुणी शिक्षण देता का शिक्षण? नागपूरमधील 700 हून अधिक पालकांचा सरकारला सवाल

आमच्या मुलांना कुणी शिक्षण देता का शिक्षण? आमच्या पाल्यांना कुणी शाळेत प्रवेश देता का प्रवेश? जंगल आणि शिवारा शिवारात भटकंती करणाऱ्या भारवाड समाजातील पालकांची ही व्यथा आहे.

आमच्या मुलांना कुणी शिक्षण देता का शिक्षण? नागपूरमधील 700 हून अधिक पालकांचा सरकारला सवाल
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 10:37 AM

नागपूर : आमच्या मुलांना कुणी शिक्षण देता का शिक्षण? आमच्या पाल्यांना कुणी शाळेत प्रवेश देता का प्रवेश? जंगल आणि शिवारा शिवारात भटकंती करणाऱ्या भारवाड समाजातील पालकांची ही व्यथा आहे. देशात शिक्षणाचा कायदा येऊन 11 वर्षे लोटले, तरिही समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहोचले नाही. एकट्या नागपूर जिल्ह्यात भटक्या समाजातील जवळपास 700 मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. आपल्या पाल्यांना शाळेत दाखला मिळावा म्हणून पालक भटकंती करतायत.

नागपूर जिल्ह्यात भटक्या समाजातील 700 च्या वर मुलं शिक्षणापासून वंचित

भारवाड या भटक्या समाजातील पालक पोट भरण्यासाठी संघर्ष करतात. या समाजाच्या कित्येक पिढ्या रानावनात भटकत राहिल्या, पण आता भारवाड समाजालाही शिक्षणातून प्रगतीचा मार्ग खुणाऊ लागलाय. नागपूर जिल्ह्यात भटक्या समाजातील 700 च्या वर मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. चार- सहा महिन्यात जिल्ह्या जिल्हयात भटकंती करत असल्याने या भटक्या समाजातील मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही. त्यामुळेच आपल्या पाल्यांना शिक्षण मिळावं, शाळेत प्रवेश मिळावा म्हणून भारवाड समाजाचे पालक नागपूरच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात चकरा मारतायत.

मुलांच्या शिक्षणासाठी पालकांकडून शिक्षण विभाग कार्यालयाच्या चकरा

मुलांच्या शिक्षणासाठी भारवाड या भटक्या समाजाचे पालक शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या चकरा मारतात. नागपूर जिल्ह्यात भटक्या समाजाचे 700 पेक्षा जास्त मुलं अद्यापही शिक्षणापासून वंचित आहेत. पालक कुठल्याही जिल्ह्यात गेले, तरिही तिथल्या स्थानिक शाळेत भारवाड समाजातील मुलांना प्रवेश मिळावा, म्हणून आता सरकारने उशीरा का होईना पावलं उचलायला सुरुवात केलीय.

शिक्षण हक्क कायद्याच्या 11 वर्षांनंतरही शेवटचा विद्यार्थी वंचितच

देशातील प्रत्येक मुलाला कायद्याने शिक्षणाचा हक्क देणारा कायदा देऊन 11 वर्षे लोटलेय. पण इतक्या वर्षांत हा कायदा शेवटच्या व्यक्तीपर्यॅत पोहोचलाच नाही. हिच आपल्या देशाची व्यथा आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात भटक्या समाजातील 700 पेक्षा जास्त मुलं कधी शाळेची पायरी चढलेच नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा :

NTA NEET JEE Main 2021: जेईई आणि नीट परीक्षेच्या निकालाच्या नियमात मोठा बदल,ऑल इंडिया रँकवर परिणाम

आश्रमशाळेचे शिक्षक कर्मचारी संकटात, 8 महिन्याचं वेतन रखडलं, बीडमध्ये उपोषण

महाविद्यालयांना लैंगिक छळ विरोधी माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करणं अनिवार्य, यशोमती ठाकूर यांची माहिती

व्हिडीओ पाहा :

Bharwad community 700 students are not getting education in Nagpur

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.