Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Mataram | नागपुरात वंदे मातरम् उद्यानाचे आज भूमिपूजन, जाणून घ्या उद्यानाची काय राहणार विशेषता

नागपुरात वंदे मातरम उद्यान साकारण्यात येणाराय. परमवीर चक्राने सन्मानित भारतीय सेनेच्या स्मृतीनिमित्त हे उद्यान तयार करण्यात येतंय. शुक्रवारी चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता याचे भूमिपूजन होतेय.

Vande Mataram | नागपुरात वंदे मातरम् उद्यानाचे आज भूमिपूजन, जाणून घ्या उद्यानाची काय राहणार विशेषता
नागपुरातील वंदे मातरम् उद्यानाचे संकल्पचित्र.
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 2:33 PM

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने हे वंदे मातरम् उद्यान साकारण्यात येत आहे. मध्य नागपुरातील प्रभाग क्रमांक एकोणवीस बजेरिया या परिसरातील एम्प्रेस मॉल समोर हे तयार होणाराय. महापालिकेला 1.20 लाख वर्गफूट जागेत हे होणाराय. कारगिल वॉर हीरो परमवीरचक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव (Yogendra Singh Yadav ) यांच्या हस्ते एम्प्रेस सिटी मॉलच्या समोर साकारण्यात येणाऱ्या वंदे मातरम् उद्यानाच्या कार्याचे भूमिपूजन शुक्रवारी संध्याकाळी होईल. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहतील, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहिदांचे सिरॅमिकचे म्युरल

एम्प्रेस मॉलसमोरील 1.20 लाख वर्गफूट जागेत साकार होणाऱ्या वंदे मातरम् उद्यानाची विशेषत:, येथील व्यवस्था, येथे उभारण्यात येणारे शहिदांचे सिरॅमिकचे म्युरल आदी सर्व बाबींची माहिती देणारी संकल्प चित्रफीत तयार करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत चित्रफितचे प्रसारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओला स्वतः महापौर दयाशंकर तिवारी यांनी आवाज दिला आहे. या उद्यानाच्या माध्यमातून लोकांमध्ये भारतीय सैन्याबद्दल आकर्षण निर्माण व्हावे आणि भारतीय सेनेत नागपूर शहरातील आणि विदर्भीय जनतेत सैन्य भरतीबद्दल आकर्षण निर्माण होवून वातावरण निर्मीती करण्यासोबतच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय सैन्याला वैदर्भीय जनतेचे अभिवादन म्हणून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर कडून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. ‘वंदे मातरम्’ उद्यान या परिसरात 21 परमवीर चक्र विजेत्यांची ग्लास फायबरचे म्युरल राहणार आहे. सोबतच प्रत्येकांची जीवनी तेथे लावण्यात येणार आहे. या शिवाय ज्या युध्दामध्ये त्यांनी आपले शौर्य प्रदर्शित केले त्या युध्दभुमीचे चित्रांकन सुध्दा सिरॅमिकचे म्युरल प्रतिमेच्या पार्श्वमध्ये करण्यात येणार आहे. प्रतिमेच्या आजूबाजूला लॅन्डस्केप करून प्रत्येक प्रतिमेला सुशोभित करण्यात येणार आहे.

भारतीय सेनेला समर्पित उद्यान

महापौर म्हणाले, परिसरात युध्दात वापरण्यात आलेले एक टँक, एक मिग विमान, एक तोफ हे सर्व वॉर ट्राफी म्हणून ठेवले जाणार आहे. या शिवाय देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये नागपूर शहरात आणि नागपूर जिल्हयात ज्या हुतात्म्यांनी आपले बलिदान दिलेले आहे. त्यांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी एक एम्पी थिएटर निर्माण केले जाणार आहे. या एम्पी थियेटरच्या पार्श्व भिंतीवर सर्व हुतात्म्याचे नाव लिहिले जाणार आहे. 250 आसनचे एम्पिथियेटर साकारले जाणार आहे. प्रत्येक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमात हे सर्व हुतात्मे साक्षी राहतील ही त्यामागची संकल्पना आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दोन खाजगी सेना निर्माण झाल्या होत्या, एक आझाद हिंद सेना आणि दुसरी हिंदुस्थानी लाल सेना. आझाद हिंद सेनेचे निर्माण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी परदेशात केले.

वयोमानाप्रमाणे व्यायामाचे यंत्र

हिंदुस्थान लाल सेनेचे निर्माण नागपूर शहरातील तेलंगखेडी तलाव ज्याला त्या काळात राणी तलाव म्हणून ओळखले जात होते. तेथे 13 ऑगस्ट 1939 या वर्षी करण्यात आले. उद्यानात हिंदुस्थानी लाल सेनेचा दिखावा सुध्दा उभारला जाणार आहे. सेनेला समर्पित हे उद्यान असल्यामुळे येथे बांबुचा पुल साकारला जाणार आहे. तो तेथे अस्तित्वात असलेल्या झाडांवरच असणार आहे. याशिवाय 7960 चौ.मी. जागेत लहान मुलांना खेळण्यासाठी जागा तयार केली जाणार आहे. तेथे लहान मुलांना दुखापत होणार नाही या दृष्टीने इपीडीएम फ्लोरिंग लावली जाणार आणि आधुनिक खेळणी लावली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या वयोमानाप्रमाणे व्यायामाचे यंत्र सुध्दा उभारले जाणार आहे. परिसरातील नागरिकांसाठी जवळपास 700 रनिंग मीटर लांबीचा वॉकिंग ट्रॅक उभारला जाणार आहे आणि ग्रीन जीमची व्यवस्था केली जाणार आहे. उद्यानाचा प्रवेशद्वार हा इंडिआ गेटच्या स्वरूपात साकारला जाणार आहे. त्याला लागूनच अमर जवान स्मारक सुध्दा साकारले जाणार आहे. अॅडव्हेंचर स्पोर्टच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन व्हावे या दृष्टीने सुध्दा पुढील कारकीर्दीत व्यवस्था करण्याचा मानस आहे.

नागपुरातल्या प्रभागरचनेचा कुणाला फायदा, कुणाला फटका? एका क्लिकवर नवी प्रभागरचना

Nagpur NMC | नदी काठावरील अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूरचे मनपा आयुक्त म्हणाले…

Nagpur Corona | नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणतात, कोरोनाला गंभीरतेने घ्या; महिनाभरात शंभरावर मृत्यू

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.