Parinay Fuke | भंडारा जिल्ह्यात कोट्यवधींची रेती तस्करी; भाजप नेते परिणय फुके यांचा गंभीर आरोप

आमदार डॉ. परिणय फुके यांनी महसूलमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत. त्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करीचा आरोप केलाय. सभागृहात पुरावे देऊनंही सरकारकडून कारवाई नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. रेती तस्करीत मोठे नेते सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलाय. यासंदर्भात परिणय फुके विधानपरिषद सभापतींचे भेट घेणार आहेत.

Parinay Fuke | भंडारा जिल्ह्यात कोट्यवधींची रेती तस्करी; भाजप नेते परिणय फुके यांचा गंभीर आरोप
भंडारा जिल्ह्यात कोट्यवधींची रेती तस्करीImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 2:28 PM

नागपूर : लिलाव न होता भंडारा जिल्ह्यात रोज कोट्यवधी रुपयांची रेती तस्करी सुरू आहे. उच्च न्यायालयाचा ( High Court) स्टे असूनंही रोज रेती तस्करी होत आहे. सरकारच्या हजारो कोटी रुपयांचा महसूल चोरीला जातोय. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात (Pawani Taluka) सर्वांधिक रेती तस्करी होत आहे. स्थानिक नेते आणि महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी सुरु आहे, असा आरोप भाजप नेते, माजीमंत्री परिणय फुके यांनी केलाय. भंडारा जिल्ह्यातील रेती तस्करीच्या पुरावे विधान परिषद सभापतींकडे दिलेय. पण अद्याप कारवाई नाही. याबाबत लवकरचं सभापतींची भेट घेणार, असंही परिणय फुके यांनी सांगितलंय. राज्यात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)सरकारविरोधात विविध घोटाळ्यांचे मुद्दे चांगलेच गाजतायत. आता परिणय फुके यांनी टाकलेला रेती तस्करीचा बॅाम्ब किती मोठा स्फोट करणार, याची चर्चा सुरु झालीय.

विधान परिषदेत पुरावे

आमदार डॉ. परिणय फुके यांनी महसूलमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत. त्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करीचा आरोप केलाय. सभागृहात पुरावे देऊनंही सरकारकडून कारवाई नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. रेती तस्करीत मोठे नेते सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलाय. यासंदर्भात परिणय फुके विधानपरिषद सभापतींचे भेट घेणार आहेत. भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा ही प्रमुख नदी वाहते. या नदीतून तुमसर, मोहाडी, पवनी तसेच लाखांदूर तालुक्यात रेतीचा उपसा केला जातो. काही ठेकेदार अतिरिक्त रेतीचा उपसा करतात. त्यामुळं शासनाचा महसूल बुडतो. यासंदर्भात विधान परिषदेत सभापतींकडं पुरावे देण्यात आले. परंतु, अद्याप कारवाई झाली नसल्याची खंत परिणय फुके यांनी व्यक्त केली.

34 महिलांचा गेला होता बळी

राज्यसरकार हे घोटाळेबाज आहे. रेतीची तस्करी होते. याचे धागेदोरे वरिष्ठांपर्यंत आहेत. रेतीची ठेकेदारी करणारे सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळं अतिरिक्त उपसा होऊनही कारवाई केली जात नाही. 2009 मध्ये भंडाऱ्याजवळ अतिरिक्त रेतीचा उपसा केला गेला होता. त्यावेळी 34 महिला उपसा केलेल्या ठिकाणी बुडून मृत्यू पावल्या. ही घटना माहीत असताना अशाप्रकारे रेतीचा उपसा केल्यास जीवितहानी होऊ शकते. त्यामुळं अशा घटनांवरअंकूश लावले आवश्यक आहे.

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; शिव्या देणाऱ्यांना मान-सन्मान, तर देवाचं नाव घेणाऱ्यांना…

Devendra Fadnavis | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं केंद्रीय गृहसचिवांना पत्र; पत्रातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Breaking : समृद्धी महामार्ग संदर्भातली मोठी बातमी! 2 मे रोजीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलला- सूत्र

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.