नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक
DEVENDRA FADNAVIS
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 7:33 PM

नागपूर : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपने नागपुरातील सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरसेवकांना निवडणुकीचा कानमंत्र दिला. (BJP getting ready for Nagpur Municipal Corporation elections 2021, Meeting of corporators in presence of Devendra Fadnavis)

नागपूर मनपात गेल्या तीन टर्मपासून भाजपची सत्ता आहे, आगामी मनपा निवडणूक जिंकण्याचीही भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरातील भाजप नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आली. दरम्यान, आम्ही नागपूर मनपा निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, असे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील 5 जिल्हा परिषद, 33 पंचायत समित्यांची पोडनिवडणूक स्थगित

कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

इतर बातम्या

भास्कर जाधवांनी विधानसभाध्यक्ष व्हावे, पण निष्पक्ष काम करावे! देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला

राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर खोचक टीका

निवडणुका लागेपर्यंत केंद्राने ओबीसी समाजाचा इम्पेरीकल डेटा गोळा करावा; शिवसेनेची मागणी

(BJP getting ready for Nagpur Municipal Corporation elections 2021, Meeting of corporators in presence of Devendra Fadnavis)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.