नागपूरमध्ये अजितदादा गटाविरोधात भाजप आक्रमक; सुनील केदार आले रडारवर, पैसे वसुलीसाठी आता मोर्चा, आशिष देशमुख उतरले मैदानात
Aashish Deshmukh- Sunil Kedar : नागपूरमध्ये सुनील केदार यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. यामुळे महायुतीत अजितदादा गटाविरोधात भाजप असा सामना रंगला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये केदारांकडून पैसे वसुलीसाठी आशिष देशमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात मोर्चा उघडला आहे.
नागपूरमध्ये महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आले आहेत. नागपूरमध्ये सुनील केदार यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. यामुळे महायुतीत अजितदादा गटाविरोधात भाजप असा सामना रंगला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये केदारांकडून पैसे वसुलीसाठी भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात मोर्चा उघडला आहे.
कारवाईसाठी दिरंगाई का?
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलं पाच वर्षाची सजादेखील देण्यात आली 22 वर्षानंतर 1444 कोटी रुपयांची वसुली हे त्यांच्या कडून होण्यासंदर्भात सहकार विभागाने आणि सहकारमंत्र्यांनी दिरंगाई केली. त्या विरोधात आज नागपूरच्या रामटेक तालुक्यात पीडित शेतकऱ्यांचा आणि खातेधारकांचा मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती आशिष देशमुख यांनी दिली.
हे तर वेळ काढूपणाचे लक्षण
दिलीप वळसे पाटलांना आहे की त्यांनी तांत्रिक अडचणी दाखवत सुनील केदार वेळ काढत आहे त्यावर आपण ऑर्डर का करत नाही? यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. वळसे पाटलांना विनंती आहे की त्यांनी या संदर्भातला ऑर्डर लवकरात लवकर काढावा जेणेकरून 1444 कोटी रुपये वसूल करून शेतकऱ्यांना आणि खातेदारकांना वितरित करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावर फैरी
धनंजय मुंडे हे कृषिमंत्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांनी विदर्भातील शेतकरी संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी यांची पळगळ झाली होती त्याची नुकसान भरपाई अजून सरकारने दिली नाही. त्यांच्याकडून मीटिंग लावून घेतली मात्र ती मीटिंग ऐनवेळी अनिल देशमुख यांच्या दबावावर कॅन्सल करण्यात आले अनिल देशमुख यांच्या दबावावर धनंजय मुंडे आणि सुनील केदार यांच्या दबावाखाली दिलीप वळसे पाटील वेळ काळूपणा करत आहे. यावरून राजकारण होताना दिसते असं माझं मत आहे, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली.
सुनील केदार यांचे दिलीप वळसे सोबत असलेले जुने संबंध आणि अनिल देशमुख यांचे धनंजय मुंडे सोबत असलेले जुने संबंध यातून वेळ काढून पणा होत आहे. मात्र यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांचा नुकसान होत आहे. शेतकरी अडचणीत असताना सुद्धा ते मंत्री कारवाई करण्यात टाळाटाळ करतात माझी विनंती आहे दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांनी आमचे शेतकऱ्यांचे हाक ऐकावी आणि त्यांना न्याय देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी देशमुखांनी केली.