ओबीसींच्या इम्पेरीकल डेटासाठी 435 कोटी द्या, अन्यथा झारीतील शुक्राचार्य कोण ते कळेल : चंद्रशेखर बावनकुळे

पुढच्या तीन महिन्यात इम्पेरीकल डाटा गोळा करायचा असेल, तर राज्य सरकारने 435 कोटी रुपये मागासवर्गीय आयोगाला द्यावे” अशी मागणी केलीय भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.

ओबीसींच्या इम्पेरीकल डेटासाठी 435 कोटी द्या, अन्यथा झारीतील शुक्राचार्य कोण ते कळेल : चंद्रशेखर बावनकुळे
chandrashekhar bawankule
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 3:50 PM

नागपूर: “ओबीसींचा इम्पेरीकल डाटा गोळा करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाने राज्य सरकारकडे435 कोटी रुपयांची मागणी केलीय. पुढच्या तीन महिन्यात इम्पेरीकल डाटा गोळा करायचा असेल, तर राज्य सरकारने 435 कोटी रुपये मागासवर्गीय आयोगाला द्यावे” अशी मागणी केलीय भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. जर राज्य सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला नाही, तर सरकारमध्ये झारीतले शुक्राचार्य कोण आहे, त्यांचे चेहरे समोर येतील, असंही यावेळी बावनकुळे म्हणाले.

काँग्रेसनं सत्तेतून बाहेर पडावं

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतलीय. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आरक्षणविरोधी आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं, अशी मागणी बावनकुळे यांनी केली होती. तसेच ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घ्यावी अशीही मागणी बावनकुळे यांनी केली होती.

राज्य सरकार ओबीसी आरक्षणाविरोधात

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाने (OBC) आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामध्येही भारतीय जनता पार्टीने ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आंदोलने देखील केली.ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण काढून घेणे हा ओबीसी समाजावर हा अन्याय असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. राज्य सरकार नेहमीच ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे. हे सरकार ओबीसीचा गळा दाबण्याचे काम करत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणं डेटा तयार करावा

सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ओबीसींचा डेटा तयार करावा. ओबीसी आयोग तयार झाला आहे. डेटा तयार करायला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण थांबवलं नाही, केवळ डेटा तयार करण्याची सूचना केलीय. पण ओबीसींना आरक्षण द्यायचं मनात नसेल म्हणून ओबीसींचा फुटबॉल केला जातोय, असा आरोप देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

विधीमंडळाचा वापर राजकारणासाठी

केंद्राकडून डेटा घेण्याचा चुकीचा ठराव विधीमंडळात आणला गेला. विधीमंडळाचा वापर राजकारणासाठी केला गेला. ओबीसी आरक्षण न देता धनदांडग्यांना ओबीसींच्या जागांवर उभं करायचं असं सरकारचं षडयंत्र आहे, असं आम्हाला वाटतं. मात्र, गावागावात, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीमध्ये झालेल्या परिषदेत दिला होता.

इतर बातम्या:

Chandrashekhar Bawankule | शिवसेना आणि राष्ट्रवादी ओबीसी आरक्षण विरोधी, काँग्रेसने साथ सोडावी

‘वन बूथ, 25 यूथ’, भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु

BJP leader Chandrashekhar Bawankule demanded 435 crore for collection of OBC empirical data for Political Reservation

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.