“ठाण्यात आदमी 1, इंजेक्शन 2, नागपुरात आदमी 2, इंजेक्शन 1, हेवीवेट मंत्र्याकडून बहुत नाइंसाफी”

भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन वाटपात विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. Chandrashekhar Bawankule slams MVA Ministers

ठाण्यात आदमी 1, इंजेक्शन 2, नागपुरात आदमी 2, इंजेक्शन 1, हेवीवेट मंत्र्याकडून बहुत नाइंसाफी
चंद्रशेखर बावनुकळे, भाजप नेते
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 12:33 PM

नागपूर: भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन वाटपात विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या सरकारमधील हेवीवेट मंत्री सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव बनवून त्यांच्या जिल्ह्यासाठी दुप्पट ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर नेत आहेत. मराठवाड्यातील एका मंत्र्यांनं 10 हजार रेमडेसिव्हीर स्टॉक केले. पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यानं 25 हजार इंजेक्शन नेले. ठाण्यात एका रुग्णामागं दोन इंजेक्शन आणि नागपूरमध्ये 2 रुग्णांमागं एक इंजेक्शन मिळत,असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. राज्यातील वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन घेत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. नागपूरमधील मंत्री जिल्ह्याला रेमडेसिव्हीर मिळवून देण्यात कमी पडत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. (BJP leader Chandrashekhar Bawankule slams mva ministers did injustice with Vidarbha in distribution of Remdesivir and oxygen )

नागपूरमधील मंत्री कमी पडतायत

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे जिल्ह्यात रुग्णामागे रेमडेसिव्हीरची 2 इंजेक्शन मिळत आहे तर नागपुरात मात्र 2 रुग्णामागे एक एवढा साठा दिला जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात ठाणे आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ देत आरोप केला. ऑक्सिजन संदर्भात सुद्धा तीच परिस्थिती आहे. नागपुरातील मंत्री आपल्या जिल्ह्याला रेमडेसिव्हर मिळवून देण्या साठी कमी पडत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती उत्पन्न झाली, असा आरोप त्यांनी केला आहे. तर, पालकमंत्री नितीन राऊत यांना याविषयी पत्र लिहिल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

विदर्भात सर्वाधिक रुग्ण, नेते वजन का वापरत नाहीत?

अनेक जिल्ह्यातील मोठे नेते आपलं वजन वापरुन आपल्या जिल्ह्याला इंजेक्शन मिळवून घेत आहेत. गोंदियामध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा जीव गेला, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात रुग्ण असताना विदर्भातील नेते आपलं वजन का वापरात नाही?,असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. विदर्भातील नेत्यांनी आपलं वजन वापरून हा अन्याय दूर करावा, असं आवाहन भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

नागपूरमध्ये बेड वाढले पण ऑक्सिजनचा तुटवडा

नागपुरात कोरोना रुग्ण वाढल्याने, काही रुग्णालयांनी बेडची संख्या वाढवली आहे. पण तिथे आता ॲाक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने, उपचार घेत असलेल्या गंभीर कोरोना रुग्णांचा जीव जाण्याची वेळ आली होती. नागपुरात शुक्रवारी 30 ते 40 मेट्रिक टन ॲाक्सिजनची नितांत गरज आहे.

संबंधित बातम्या:

नागपुरात आताच्या आता 30 ते 40 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज, शेकडो रुग्ण जीवन-मरणाच्या दारात!

Nagpur Corona Update : नागपुरातील मृत्यूदर चिंताजनक, दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू

(BJP leader Chandrashekhar Bawankule slams mva ministers did injustice with Vidarbha in distribution of Remdesivir and oxygen )

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.