शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली भाजपच देतंय, संजय राऊत यांनी बॉम्ब टाकला; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रातील असो, दिल्लीतील असो की इतर राज्यातील सरकारमधील भ्रष्टाचारी लोक राजीनामा देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात भ्रष्टाचार नको. मोदी नागपूरला आले होते.

शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली भाजपच देतंय, संजय राऊत यांनी बॉम्ब टाकला; राजकीय वर्तुळात खळबळ
शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली भाजपच देतंय, संजय राऊत यांनी बॉम्ब टाकला; राजकीय वर्तुळात खळबळ Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 11:53 AM

नागपूर: भाजप आणि शिंदे गट दोघे मिळून सरकार चालवत आहे. पण प्रकरण एकाच गटाचं निघत आहे. त्यावरून फायली कोण देतंय हे समजून जा. आम्हाला भाजपचेच लोक फायली पुरवत आहेत, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ज्या प्रकारे विरोधी पक्षाचा हल्ला सुरू आहे. त्यावरून सरकार नक्कीच पळ काढत आहे, अशी टीकाही राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केली.

अधिवेशनात सीमाप्रश्नाचा ठराव येणार होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सीमावादाचा ठराव येत असताना इतर कोणतेही विषय घेऊ नका म्हणून सांगितलं. त्यामुळे आम्ही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं विधानसभेत मांडली नाहीत. अनेक प्रकरणं आहेत. ही प्रकरणं देणारे तुमचेच सहकारी आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी घोटाळा हे एक टोक आहे. अजून असंख्यप्रकरणं बाहेर येतील, असा दावाही त्यांनी केला.

महाराष्ट्रातील असो, दिल्लीतील असो की इतर राज्यातील सरकारमधील भ्रष्टाचारी लोक राजीनामा देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात भ्रष्टाचार नको. मोदी नागपूरला आले होते.

त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असं सांगितलं. पण त्यांनी आजूबाजूला पाहिले असते तर भ्रष्टाचारी लोक दिसले असते. या सरकारचा हेतू भ्रष्टाचार करणं आहे. आम्ही हे सरकार चालू देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

मी आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे. हा भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन पळणं फडणवीस आणि भाजपला जड होत असेल. हे सर्व लोक अलिबाबा चाळीस चोरमधले आहेत. हळूहळू चाळीस आमदारांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येतील, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आजही अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सभागृह दणाणून सोडलं. विरोधकांनी विधानभवनाच्या पायरीवर जोरदार घोषणाबाजी करत आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं. दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर… अशा घोषणा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरून दिल्या.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.