हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय? हिंदू राष्ट्राची ‘ती’ संकल्पना मान्य आहे काय?; नाना पटोले यांचं भाजपला चॅलेंज

राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याचा आणि राजकीय भेटीगाठीचा प्रोग्रॅम अजून आलेला नाही. मात्र, विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम सुरू आहे. मोट बांधली जात आहे. नितीश कुमार यांना संयोजक करण्यात आलं आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय? हिंदू राष्ट्राची 'ती' संकल्पना मान्य आहे काय?; नाना पटोले यांचं भाजपला चॅलेंज
nana patoleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 12:42 PM

नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी. नाही तर त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. बावनकुळे यांनी हा इशारा दिलेला असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला डिवचले आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे काय? तुमची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय आहे? ही संकल्पना स्पष्ट करा; असं आव्हानच नाना पटोले यांनी दिलं आहे. नागपूर येथे मीडियाशी संवाद साधताना ते बोलत होते.

आपण हिंदुस्थानातच राहतो. हिंदू राष्ट्राचा अर्थ भाजपने सांगावा. हिंदू राष्ट्र म्हणजे काय ते त्यांनी सांगावं. भाजप ज्यांना मानते त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय होती? ते त्यांनी स्पष्ट करावी. या देशात बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम राहतात. ते या देशात राहणार नाहीत अशी त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे काय? असा सवाल करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभाव मांडला. भाजपने हिंदुत्व सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सातत्याने केले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम केलं आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

हे सुद्धा वाचा

सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न

काँग्रेसचे सर्व नेते वज्रमूठ सभेला उपस्थित राहतील. त्या ठिकाणी सभा होऊ नये यासाठी भाजपने प्रयत्न केले. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेची सगळी तयारी झालेली आहे. संजय राऊतही नागपुरात येणार आहे. सभेची जय्यत तयारी झालेली आहे, असं पटोले म्हणाले.

प्रोग्रॅम आलेला नाही

राहुल गांधी मातोश्रीवर जाणार आहेत काय? या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी यांचा मुंबई दौरा आणि भेटींचा प्रोग्रॅम अजून आलेला नाही. भाजप विरोधातील सगळे लोक एकत्र येत आहेत. नितीश कुमार यांना संयोजक करण्यात आलेले आहे. भाजप विरोधात मोट बांधण्याचा काम सुरू आहे. भाजप विरोधी राजकीय दलांचं एकत्र आणण्याचा काम काँग्रेस करत आहे. देश वाचवण्याच काम काँग्रेस करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

त्यासाठी तुम्हाला बसवलं नाही

विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जाणीवपूर्वक लक्ष भरकटण्याचे काम चालू आहे. महागाई वाढली आहे, यावर सत्ता पक्षाचे लोकांनी लक्ष घातलं पाहिजे. मात्र याला तोडणे, त्याला तोडण्याचे काम चालू आहे. जनतेने तुम्हाला लुटण्यासाठी किंवा तोडातोडीसाठी आणलेलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी बसवलेले आहे. त्यावर चर्चा केली पाहिजे, असं ते म्हणाले.

Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.