आमदारांच्या उणिवांवर बोट, कोणते आमदार किती कमी पडले?; भाजप प्रदेश अध्यक्षांच्या सूचना काय?

भाजपच्या वरिष्ठांनी दिल्लीवरून प्रदेश पातळीवरील नेत्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एक सर्वेक्षण करण्यात आलं. आमदारांमध्ये असलेल्या उणिवांबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित आमदारांना सूचना दिली आहे.

आमदारांच्या उणिवांवर बोट, कोणते आमदार किती कमी पडले?; भाजप प्रदेश अध्यक्षांच्या सूचना काय?
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 10:06 AM

नागपूर : आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी काय विकासकाम केलीत. याचा आढावा घेतला जातो. ते कुठं कमी असतील, तर त्यांना तशा सूचना दिल्या जातात. जेणेकरून जनतेची कामं झाली पाहिजे. तसेच त्या कामांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. अशी भाजपची कामाची पद्धत आहे. त्या दृष्टिकोनातून भाजपची टीम सध्या कामाला लागली आहे. आमदारांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला जात आहे. ते कुठं कमी असतील, तर त्यांना तशा सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे त्या उणिवा ते कमी करून स्वतःचा परफार्मन्स अधिक चांगला करतील. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित आमदारांना काही सूचना दिल्या आहेत.

आमदरांच्या रिपोर्टमध्ये काय?

भाजपच्या वरिष्ठांनी दिल्लीवरून प्रदेश पातळीवरील नेत्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एक सर्वेक्षण करण्यात आलं. आमदारांमध्ये असलेल्या उणिवांबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित आमदारांना सूचना दिली आहे. आमदार जनसंपर्कात किती कमी आहेत. विकासकामात किती कमी आहेत. सोशल मीडियावर काय कमी आहेत. किती विकासकामे करायची आहेत. मतदारसंघाबाबत काय रिपोर्ट आहे. जवळपास प्रत्येक आमदारांचे सुमारे १०० पानांचा रिपोर्ट आहे.

हे सुद्धा वाचा

पाच-सहा पानांच्या उणिवांचा रिपोर्ट

पाच-सहा पानांचा उणिवांचा रिपोर्ट आमदारांच्या हातात देण्यात आला. तेव्हा सगळे आमदार अचंबित झाले. सरकारच्या काळात आमदार कुठं-कुठं कमी पडले. मतदारसंघात काय स्थिती होती. मतदारसंघाची परिस्थिती काय आहे. आमदार कितपत तयार आहेत.

नऊ महिन्यांचा लेखाजोगा

भाजप आमदार यांना कामगिरी सुधारण्याच्या सूचना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात. आमदारांच्या विधानसभा मतदार संघात सर्वेक्षण केले जाणार आहे. नऊ महिन्यांचा लेखाजोगा मांडावा लागणार आहे. त्यानंतर अधिक सक्रिय होण्याच्या सूचना दिल्या जातील.

विधानसभा क्षेत्रात काम करत असताना आमदारांनी बरीच कसरत करावी लागते. एकीकडे पक्षाच्या सूचना तर दुसरीकडे लोकांच्या समस्या. नागरिक समस्या घेऊन आमदारांना भेटी देत असतात. अशात ते कुठं कमी तर पडत नाही ना, याचा अहवाल तयार केला जातो. ते कुठं कमी पडत असतील, तर पक्षाकडून तशा सूचना दिल्या जातात. त्यात संबधित आमदारांना सुधारणा करण्यात मदत होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.