“वंचितबरोबर आघाडी केल्याने किंचित सेना म्हणून हिणवले”; भाजपकडून ठाकरे गटावर सडकून टीका
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किंचित सेना म्हणून डिवचण्याचेच काम या भाजपने केले आहे. त्यामुळे किंचित सेना असा उल्लेख केल्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आता वाढली आहे.
नागपूरः राज्यातील विविध भागातील पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यातच तांबे पिता पुत्रांच्या उमेदवारीवरून उडलेला गोळ ही घटनाही राज्यातील राजकारणासाठी भर घालणारी ठरली. त्यातच आज नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला मतदारांचा मेळावा घेतला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
तत्कालीन मविआ सरकारच्या कामकाजावर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची किंचित सेना आणि वंचित सेना मिळून भीमसेना होऊ शकत नसल्याचा टोला त्यांनी या नव्या आघाडीवर टीका केली आहे.
यावेळी त्यांनी शिक्षक मतदार संघाचे उमेदवार नागो गाणार यांच्या विजयासाठी प्रत्येक समर्थकाने दोन तास काढून प्रचार करावा असेही आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
भाजपच्या नेत्यांकडून शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवरून आणि सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीती घटक पक्षावरही तुटून पडताना दिसून येत आहे.
त्यातच वंचित बहुजन आघाडीने आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याने भाजपकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना नसून ही किंचित सेना असल्याची टीका त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किंचित सेना म्हणून डिवचण्याचेच काम या भाजपने केले आहे. त्यामुळे किंचित सेना असा उल्लेख केल्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आता वाढली आहे.
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपकडून मात्र महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही.
आता भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा किंचित सेना असा उल्लेख केल्याने आता ठाकरे गटाकडून नेमकं काय प्रत्यु्त्तर मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.