Nagpur Baby | जन्मताच पडलं निळ शरीर, हृदयाची रक्तवाहिनी फुफ्फुसाला जोडली, दोन दिवसांच्या शिशूचा जीव वाचला
नागपुरात एक अनोखी घटना घडली. जन्मताच बाळ निळे होऊ लागले. डॉक्टरांनी निदान केलं. बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 17 दिवसांच्या उपचारानंतर बाळ सुखरूप आहे. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे बाळाच्या आईवडिलांनी आभार मानले.
नागपूर : निळ्या पडलेल्या नवजात शिशूचा जीव वाचला. हृदयाकडे नेणारे रक्त शुद्धीकरणासाठी (Purification) फुप्फुसाकडे पाठवण्याऐवजी प्रणालीगत विचलीत व्हायचे. दोन दिवसांच्या बाळाला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांच्या बाळाचं शरीर निळं पडलं होतं. दोन दिवसांच्या बाळावर हृदयाची रक्तवाहिनी (Vascular) फुफ्फुसाला जोडणारी शस्रक्रिया यशस्वी करण्यात आली. हृदयाची रक्तवाहिनी फुफ्फुसाला जोडण्याची शस्रक्रिया यशस्वी झाली. नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात शस्रक्रिया (Surgery) यशस्वी करण्यात आली. नागपुरात एक अनोखी घटना घडली. जन्मताच बाळ निळे होऊ लागले. डॉक्टरांनी निदान केलं. बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 17 दिवसांच्या उपचारानंतर बाळ सुखरूप आहे. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे बाळाच्या आईवडिलांनी आभार मानले.
जन्मानंतर त्वचेचा रंग निळा
23 मार्च रोजी नागपुरातील एका महिलेनं बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाळाचे वजन सव्वादोन किलो होते. बाळाला ह्रदयविकार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 24 मार्च रोजी कुटुंबीय बाळाला घेऊन खासगी रुग्णालयात गेले. ह्रदरोग चिकित्सक डॉ. निकुंज पवार यांनी तपासले. रोगाचे निदान केले. कन्जनायटल सायनोटिक हार्ट डिसीज असं या आराजाचं निदान झालं. डॉ. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्रदय फुफ्फुसापर्यंत रक्त पोहचविते. ह्रदय, फुफ्फुस व रक्तामध्ये समस्या निर्माण होतात. अशावेळी रक्तात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. त्यामुळं त्वचेचा रंग निळा पडतो.
17 दिवसांच्या उपचारानंतर बाळ धोक्याबाहेर
बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, काही दिवस धोकादायक होते. त्यामुळं पोषणाची समस्या होती. बाळ थंड पडू शकत होते. फुफ्फूसही बंद पडू शकत होते. 17 दिवसांच्या उपचारानंतर बाळ बरे झाले. तरीही बाळावर दीड-दोन वर्षानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यावेळी ह्रदयाचे छिद्र बंद केले जातील. ह्रदयातून फुफ्फूसाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांचा आकार मोठा केला जाईल, अशी माहिती डॉ. निकुंज पवार यांनी दिली.
डॉक्टरांचे मानले आभार
बाळ जिवंत राहतो की, नाही, अशी परिस्थिती होती. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. दोन दिवसांच्या बाळाचा जीव वाचविला. त्यामुळं त्याचे आईवडील खूश आहेत. बाळाच्या आईवडील व नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले.