Nagpur Crime | नागपुरात संशयास्पद स्थितीत वृद्धाचा मृतदेह; गळ्याभोवती दोर, घातपाताची शक्यता

नागपुरातल्या सिद्धार्थ गायकवाड यांच्या मृतदेहाच्या गळ्याभोवती दोर आवळलेला आहे. मात्र मृतदेह हा लटकलेला नाही. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास अजनी पोलिसांनी सुरू केला आहे.

Nagpur Crime | नागपुरात संशयास्पद स्थितीत वृद्धाचा मृतदेह; गळ्याभोवती दोर, घातपाताची शक्यता
नागपुरातील मृतक सिद्धार्थ गायकवाड व त्यांचं घर. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 3:39 PM

नागपूर : नागपुरात एका 60 वर्षीय वृद्धचा मृतदेह त्यांच्याच घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आलाय. सिद्धार्थ गायकवाड (Siddharth Gaikwad) असं मृतक इसमाचं नाव आहे. ते अजनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या धारीवाड लेआउटमध्ये (Dhariwad Layout) राहत होते. मृतदेहाच्या गळ्याभोवती दोर आवळला आहे. मात्र मृतदेह हा खाली जमिनीवरील गादीवर झोपलेल्या अवस्थेत असल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. नेमकी आत्महत्या की हत्या याचा शोध धंतोली पोलीस (Dhantoli Police) घेत आहेत. परिस्थितीजन्य पुरावे पाहता मृत्यू संशयास्पद झाला आहे. पोलिसांच्या तपासात नेमकं काय घडलं ते पुढे येणारच. मात्र परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

हातात कामही नव्हते

सिद्धार्थ गायकवाड हे पूर्वी फेब्रिकेशनच्या कारखान्यात काम करायचे. काही दिवसांपासून त्यांच्याकडे काम नव्हतं. आज सकाळी 8 वाजल्याच्या सुमारास सिद्धार्थ यांची पत्नी त्यांना उठवण्यासाठी समोरच्या खोलीत आली. त्यांना त्यांचा मृतदेह दिसून आला. त्यांनी घरातचं झोपलेल्या मुलीला आणि मुलाला या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.

धक्कादायक खुलाशाची शक्यता

सिद्धार्थ यांच्या मृतदेहाच्या गळ्याभोवती दोर आवळलेला आहे. मात्र मृतदेह हा लटकलेला नाही. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास अजनी पोलिसांनी सुरू केला आहे. घटनास्थळी मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली. तपासाअंती धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी माहिती धंतोली पोलीस ठाणयाचे सारीन दुर्गे यांनी दिली.

Video Nagpur freestyle | सात युवतींमध्ये जोरदार फ्रिस्टाईल, भर रस्त्यावर सुरू आहे झटापट, नागपुरात व्हिडीओ व्हायरल

Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी

Chandrapur Crime | चंद्रपुरातील युवतीचे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी गजाआड, दोन मैत्रिणींच्या द्वेषातून हत्या?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.