Nagpur Crime | भावाची आत्महत्या, पतीचा आजारपणात मृत्यू; पीडितेवर पोलीस शिपायाचा अत्याचार, नागपुरातून आरोपी पसार

लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत पोलिसानेच विधवेवर अत्याचार केल्याची घटना घडली. लग्नाचे आमिष दाखवत एका विधवेवर चक्क एका पोलीस शिपायानेच अत्याचार केला. लग्नास नकार दिल्यानंतर त्याच्या विरोधात या पीडित महिलेने तक्रार दाखल केली.

Nagpur Crime | भावाची आत्महत्या, पतीचा आजारपणात मृत्यू; पीडितेवर पोलीस शिपायाचा अत्याचार, नागपुरातून आरोपी पसार
पीडितेवर पोलीस शिपायाचा अत्याचारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 1:51 PM

नागपूर : शहरातील पीडित महिलेच्या भावाने 2012 मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर या घटनेचा तपास पोलीस शिपाई हेमंत कुमरे (Hemant Kumre) याच्याकडे होता. चौकशीदरम्यान, त्याने तपासाचा भाग म्हणून पीडितेचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर दोघांमध्ये बोलचाल सुरू झाली. अशातच, 2014 मध्ये महिलेच्या पतीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. भाऊ आणि पती गेल्यानंतर महिला ही एकटी पडली. या परिस्थितीचा फायदा हेमंत कुमरे याने घेतला. तो तिला फोन करायचा. दरम्यान, 2015 मध्ये हेमंतने महिलेला खोब्रागडे चौकात (Khobragade Road) भेटण्यासाठी बोलावले. पोलिसाने बोलविल्याप्रमाणे ती भेटण्याकरिता आली. हेमंत मारोती आल्टो कार घेऊन आला. तिला सोबत घेऊन सावनेर रोडवरील (Savner Road) एका सुनसान ठिकाणी नेले. त्याठिकाणी त्याने तिच्यासोबत जबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पत्नीला सोडणार असल्याचे सांगितले

पत्नीशी पटत नसल्यामुळे मी तिला लवकरच सोडणार असल्याचे हेमंतने महिलेला सांगितले. मला तुझ्याशीच लग्न करायचे असल्याचा विश्‍वास दिला. त्यानंतरही महिलेने त्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तो महिलेला भावाच्या आत्महत्येच्या प्रकरणाची धमकी देऊ लागला. हेमंतच्या या धमकीमुळे महिला त्याच्या वासनेला बळी पडली. महिलेने हेमंतला लग्नाची गळ घातली. लग्न कधी करणार, असा तगादा लावला. तो लग्नासाठी टाळाटाळ करत होता. तो तिला मारहाणही करीत होता. लकडगंज वाहतूक शाखेत हेमंतची बदली झाली. त्यानंतर त्याने तिला भेटणे, बोलणे बंद केले.

पोलीस शिपाई हेमंत कुमरे पसार

लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत पोलिसानेच विधवेवर अत्याचार केल्याची घटना घडली. लग्नाचे आमिष दाखवत एका विधवेवर चक्क एका पोलीस शिपायानेच अत्याचार केला. लग्नास नकार दिल्यानंतर त्याच्या विरोधात या पीडित महिलेने तक्रार दाखल केली. लकडगंज पोलिसांनी पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल केला. आता हेमंत कुमरे पसार झाला. पोलीस शिपायानेच घात केल्यानं ही महिला आता अधांतरी झाली आहे. एकीकडं भावानं आत्महत्या केली. दुसरीकडं पतीचा आजारपणात मृत्यू झाला. आणि पोलीस शिपायाने तिचा गैरफायदा घेतला. त्यामुळं ती रस्त्यावर आली आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.