Nagpur Metro : हातात ब्रश, रंग, प्रवास नागपूर मेट्रोतून, मेट्रोमध्ये साकारले 75 चित्र, सेंट उरसुला गर्ल्स स्कूलचा अभिनव प्रयोग

नागपूरच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला. नागपूर मेट्रोमध्ये 75 मिनिटे प्रवास 75 विद्यार्थी आणि त्यांनी साकारलेले 75 चित्र मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरलं.

Nagpur Metro : हातात ब्रश, रंग, प्रवास नागपूर मेट्रोतून, मेट्रोमध्ये साकारले 75 चित्र, सेंट उरसुला गर्ल्स स्कूलचा अभिनव प्रयोग
हातात ब्रश, रंग, प्रवास नागपूर मेट्रोतून, मेट्रोमध्ये साकारले 75 चित्र
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 5:00 PM

नागपूर : शाळेच्या गणवेशातील विद्यार्थी हातात कॅनव्हास, रंग, आणि ब्रश घेतला. सेंट उरसुला गर्ल्स स्कूलच्या (St Ursula Girls School) 75 विद्यार्थिनी मेट्रोच्या प्रवासाला निघाल्या. या विद्यार्थ्यांनी (Students) 75 मिनिटांचा मेट्रो प्रवास करत या दरम्यान स्वातंत्र्याच्या 75 वर्षावरील चित्र कॅनव्हासवर साकार केले. विद्यार्थी चालत्या मेट्रोमध्ये चित्र साकारत होते. त्यांचे शिक्षक त्यांचं मार्गदर्शन करत होते. एकीकडे मेट्रोचा प्रवास आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या कॅनव्हासवर साकारली जात असलेली चित्र जणू काही देशभक्तीचं (Patriotism) एक वातावरण निर्माण करत होते. या उपक्रमामुळे विद्यार्थीसुद्धा खूश असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मेट्रोतून 75 मिनिटे 75 विद्यार्थ्यांचा प्रवास

नागपूरच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला. नागपूर मेट्रोमध्ये 75 मिनिटे प्रवास 75 विद्यार्थी आणि त्यांनी साकारलेले 75 चित्र मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरलं. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षाची आठवण जागृत करणारे चित्रकरिता साकार केली. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने साजरा करत आहे. मात्र या विद्यार्थ्यांनी मात्र एक वेगळाच अनुभव घेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.

नागपूर मेट्रोचा प्रवास आनंददायी

नागपूर मेट्रोचा प्रवास हा आनंददायी आहे. याचा प्रत्यय मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. उंचावरून जाणारी मेट्रो सारे शहर दाखविते. नागपूर शहराचा नजारा पाहायचा असेल, तर मेट्रोतून हे सर्व स्पष्टपणे दिसते. उंचावरून मेट्रो जाते तेव्हा आपण हवेतून तर उडत नाही ना, असा भास होतो. विमानातून प्रवास केल्यासारखं वाटतं. असं काही विद्यार्थी प्रवास करून आल्यानंतर सांगत होते. स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही फॅब्रिक पेंटिंग केली. याबद्दल आम्हाला प्राऊड फील होतंय. आमचा काहीतरी सहभाग होता, असं वाटतं. मेट्रोतून प्रवास केल्यानं एक वेगळ्याच आनंद मिळाला. शाळेचं प्रतिनिधीत्व केलं. हे चिरकाल स्मरणात राहील.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.