नागपूर : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका (Assembly elections in Uttar Pradesh) झाल्या. या निवडणुकीत बसपाचा पराभव (defeat of BSP) झाला. यामुळं बसपाला पराभवाची चव चाखावी लागली. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत बसपाची काय स्थिती राहील. यावर विचारमंथन सुरू झाले आहे. शिवाय राज्यात बसपाची स्थिती फारशी चांगली नाही. यूपी निवडणुकीचा मनपा निवडणुकीवर काही परिणाम होणार काय. निवडणुकीत होणाऱ्या डॅमेज कंट्रोल कसे रोखता येईल, यासाठी बसपा आता चिंतन शिबिर घेणार (will hold a meditation camp) आहे. पुण्यातील कॅम्प परीसरात 9 आणि 10 एप्रिल रोजी दोन दिवसांचे प्रशिक्षण व चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आजी-माजी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
एकेकाळी उत्तरप्रदेशात बसपाची सत्ता होती. विदर्भात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. पण, सध्या बसपाची अवस्था बिकट झाली आहे. उत्तर प्रदेशात बसपाचे चार वेळा सत्ता हस्तगत केली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाला फक्त एक आमदार निवडून आणता आला. मतदारानाची टक्केवारीही खूपच कमी आहे. 2017 च्या निवडणुकीत बसपाला 22 टक्के मतदान मिळाले होते. यावेळी फक्त 12.88 टक्के मतदान मिळाले. याचा अर्थ 9.35 टक्के इतके बसपाचे मतदान कमी झाले. हा पराभव बसपाच्या जिव्हारी लागला आहे. विदर्भात बसपाची कार्यकर्त्यांची टीम कामाला लागली आहे.
बसपाने विदर्भाची धुरा आता अॅड. सुनील डोंगरे यांच्याकडं दिली आहे. डोंगरे यांना प्रदेश प्रभारी म्हणून निवडण्यात आले. या निवडीबद्दल नागपूरच्या प्रदेश कार्यालयात डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रंजना ढोरे, महेंद्र रामटेके, उत्तम शेवडे, विजयकुमार डहाट, संदीप मेश्राम, राजीव भांगे, चंद्रशेखर कांबळे, प्रताप सुर्यवंशी, सुरेखाताई डोंगरे, विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, महेश सहारे, सागर लोखंडे, योगेश लांजेवार, संजय जयस्वाल, इब्राहिम टेलर हे महत्त्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते. हे आता पक्षात प्राण फुंकण्यात किती यशस्वी ठरतात, हे येणारी निवडणूकच सांगेल. पण, बसपाने नागपुरात हत्तीची चाल सुरू केली आहे.
यावेळी नागपुरातील महापौर बनाओ अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने अनेक कार्यकर्त्यांनी विधायक सूचना मांडल्या. त्यात प्रामुख्याने मनोज निकाळजे, महेश वासनिक, ओपुल तामगाडगे, चंद्रशेखर कांबळे, अमित सिंग, सचिन कुंभारे, प्रीतम खडतकर, उमेश मेश्राम यांचा समावेश होता.