महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे धोकादायक स्थितीत, पर्यटकांचा जीव धोक्यात ?
यापुर्वी महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यातून प्राणी बाहेर आल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवानं यात कसल्याची प्रकारची हानी झाली नाही. पुन्हा तशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
गजानन उमाटे, नागपूर : नागपुरातील (Nagpur) 130 वर्षे जुन्या महाराजबाग (maharajbag) प्राणिसंग्रहालयातील पिंजरे खिळखिळे झाले आहे. या प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळं याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आलाय. नागपुरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालयाला 130 वर्षे पूर्ण झाले आहे. विदर्भातील आकर्षणाचं केंद्र असलेले हे प्राणीसंग्रहालयातील पिंजरे मात्र आता खिळखिळे झाल्याचे पाहायला मिळत आहे. निधी अभावी या प्राणीसंग्रहालय (zoological museum) विकास खुंटल्याची माहिती मिळाली आहे.
प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे गंजले
सध्या नागपूरमधील महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राणी असलेले पिंजरे गंजले आहेत. काही ठिकाणी तुटले आहेत, त्याचबरोबर धोकादायक स्थितीत आहे. नव्या नियमानुसार प्राणी असलेल्या ठिकाणी पिंजरे न करता खंदक करणे आवश्यक आहे. यासाठी महाराजबाग प्रशासनाने सरकारकडे 84 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, त्यामुळं प्राणिसंग्रहालयाची स्थिती अधिक वाईट आहे अशी माहिती महाराजबाग प्राणिसंग्रहालय, व्यवस्थापक, सुनील बावस्कर यांनी दिली.
वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज
यापुर्वी महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यातून प्राणी बाहेर आल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवानं यात कसल्याची प्रकारची हानी झाली नाही. पुन्हा तशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. पाहायला येणाऱ्या पर्यटकांना काही सुचना द्याव्या लागत आहेत. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी प्राणी संग्रहालयात मोठी गर्दी असते.
नागपूरात प्राणी संग्रहालयात अनेक प्राणी आहेत. मागच्या 130 वर्षांपासून तिथं लोकांची गर्दी असते. त्याचबरोबर परदेशातील सुध्दा पर्यटक तिथं भेट देत असतात. इतक्या जुन्या प्राणी संग्रहालयात पिंजऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. पर्यटक पाहायला आल्यानंतर एखादा प्राणी अचानक बाहेर आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यवस्थापकांनी बोलून दाखवली आहे.