Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Helpline | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर, फोन करून समुपदेशन करा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने समुपदेशक नियुक्त केले आहेत. नागपूर विभागीय मंडळात चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे.

Nagpur Helpline | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर, फोन करून समुपदेशन करा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 4:50 AM

नागपूर : दहावी आणि बारावीत विद्यार्थी गेले की, मनात एक दडपण असते. बोर्डाची परीक्षा कशी द्यावी, असा विचार मनात येतो. ही भीती दूर घालविण्यासाठी नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने (Nagpur Divisional Board of Education) पुढाकार घेतला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यासाठी चार समुपदेशकांची नियुक्ती (Appointment of four counselors) करण्यात आली आहे. परीक्षेसंदर्भात माहिती देण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुरू केले आहे. या हेल्पलाईनवर विद्यार्थी आपल्या समस्या सांगू शकतात. त्यांच्या समस्यांवर समुपदेशक (Counselor) योग्य मार्गदर्शन करतील. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना काय करावे हे कधी-कधी समजत नाही. अशावेळी तुमच्या मदतीला हे समुपदेशक कामास येतील. त्यामुळं मनात कोणत्याही प्रकारची भीती न ठेवता. तुमच्या मनातील प्रश्न समुपदेशकांना विचारावे. विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे. या संधीचे सोने करावे.

किती विद्यार्थी देणार परीक्षा?

भंडारा जिल्ह्यात 17 हजार 20 विद्यार्थी दहावीची, तर 18 हजार 107 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नागपूर शहरात 33 हजार 498 विद्यार्थी दहावीची, तर 37 हजार 805 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. तर नागपूर ग्रामीणमध्ये 27 हजार 590 विद्यार्थी दहावीची, तर 26 हजार 584 बारावीचे विद्यार्थी परीक्षा देणार आहे. याशिवाय चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातही विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळी नऊ ते सायंकाळी सातदरम्यान करा तक्रार

राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी व त्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून नावे मागितली. त्यापैकी चार अधिकाऱ्यांना समुपदेशनासाठी नियुक्त करण्यात आले आहे. चार फेब्रुवारीपासून ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सात दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात काही अडचणी असतील तर खालील क्रमांकावर संपर्क करावा. संबंधित अधिकारी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतात. 0712-2565403 या लँडलाईनवर संपर्क साधता येईल. श्रीराम चव्हाण (9822695372), ए. एन. कन्नमवार (9623456828), जी. व्ही. आडे (9420719049) तसेच जे. के. बांते (9423703092) यांच्याशी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजतादरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spices Price | मिरचीसह मसाल्यांना महागाईचा ठसका, खसखस व लवंगला सोन्याचा भाव…

Nagpur Collector | नागपूर जिल्ह्यात आज फेरफार अदालत; कुठे करता येणार शेती-मालमत्तेची फेरफार?

मॅनेजर बायकोच्या चारित्र्यावर संशय, खुनाच्या इराद्याने ऑफिस गाठलं, चाकू हल्ल्यात बॉस गंभीर

'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं.
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.