Cyber Crime | कस्टमर केअरला फोन केला, बँकेच्या माहितीची लिंक भरून पाठविली; गमावले साडेचार लाख
सायबर गुन्हेगारानं त्या माहितीच्या आधारे प्रसाद यांच्या बँक खात्यातील साडेचार लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. यानंतर प्रसाद यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नागपूर : बँकेचे व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यात ऑनलाईन व्यवहार म्हटलं तर जरा जास्तच अलर्ट राहावं लागतं. कारण सायबर गुन्हेगार केव्हा काय करतील. काही सांगता येत नाही. असाच एक प्रकार यशोधरानगर पोलीस हद्दीत घडला. स्टेट बँकेचे अॅप काम करत नसल्यानं कस्टमर केअरला (Customer Care) फोन करण्यात आला. पण, समोरच्यानं एक लिंक पाठविली. त्यात बँकेचे डिटेल्स भरण्यास सांगण्यात आले. ती माहिती भरून पाठविल्यानंतर भरताच प्रकार घडला. लिंकवर माहिती मागविणाऱ्यानं बँकेच्या खात्यातील साडेचार लाखांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली होती.
लिंकवर माहिती पाठविणे महागात पडले
अमितकुमार विष्णुदेव प्रसाद (वय ३९) हे भिलगावच्या गोकुलनगरात राहतात. तीन डिसेंबरला दुपारी त्यांचे स्टेट बँकेचे योनो अॅप काम करत नव्हते. त्यांनी कस्टमर केअरला फोन केला. तो फोन अटेंड करणाऱ्या व्यक्तीनं एक लिंग पाठविली. ती ओपन करून प्रसाद यांनी आपल्या बँक खात्याची माहिती (bank information) पाठविली. आता आपलं अॅप व्यवस्थित काम करेल, असं त्यांना वाटलं. पण, जे घडलं त्यामुळं त्यांचा मनस्ताप अधिकच वाढला.
फसवणुकीचा गुन्हा
दरम्यान,सायबर गुन्हेगारानं त्या माहितीच्या आधारे प्रसाद यांच्या बँक खात्यातील साडेचार लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. यानंतर प्रसाद यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आता आरोपींचा शोध घेतला जात आहे.
उमरेडमध्येही घडले होते प्रकरण
एक प्रकरण उमरेडमध्ये घडल होतं. क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर सांगा. असा फोन एका ग्राहकाला आला. त्यांनी होकार देताच त्यांच्याकडून बँकेचे डिटेल्स मागविण्यात आले. त्यानंतर थोड्या वेळात त्यांच्या खात्यातील रक्क्म गहाळ करण्यात आली. त्यामुळं बँकेचे डिटेल्स कुणालाही देऊ नका. पासवर्ड तर अजीबात सांगू नका, असं आवाहन बँकेचे अधिकारी करतात.