देवदर्शन आणि पर्यटनाहून घरी परतत होते, वाटेतच भरधाव कार ट्रकला धडकली अन्…

देवदर्शन आणि पर्यटन करुन घरी परतत असतानाच वाटेत घात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन् रस्त्यात किंकाळ्या उडाल्या.

देवदर्शन आणि पर्यटनाहून घरी परतत होते, वाटेतच भरधाव कार ट्रकला धडकली अन्...
भरधाव कार ट्रकला धडकल्याने अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 12:10 PM

नागपूर : देवदर्शन आणि पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबीयांची कार ट्रकवर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रामटेकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूरहून भंडाऱ्याला परतत असताना रामटेक-भंडारा मार्गावर असलेल्या आरोली खंडाळा गावाजवळ ही घटना घडली. या घटनेमुळे भेंडारकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्या सुरु केले.

काय घडलं नेमकं?

भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजेश भेंडारकर हे आपल्या कुटुंबीयांसह कारने नागपूर जिल्ह्यातील रामटेक दर्शनासाठी आले होते. कारमध्ये एकून 11 जण होते. यात तीन मुलांचा समावेश आहे. रामटेकला दर्शन घेऊन आणि पर्यटन करुन भेंडारकर कुटुंबीय पुन्हा भंडाऱ्यात आपल्या घरी परतत होते. यावेळी रामटेक-भंडारा मार्गावर असलेल्या आरोली खंडाळा गावाजवळ चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. यात कारचा चक्काचूर झाला.

तिघांचा मृत्यू, आठ जण जखमी

अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये तीन लहान मुलं आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.