CBI : नीट परीक्षेतील गैरप्रकार भोवला, नागपुरात 5 विद्यार्थ्यांसह कोचिंग क्लासच्या संचालकाला सीबीआयकडून अटक

नागपूरमध्ये नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडं झालं आहे. नीट परीक्षा रविवारी देशभरातील 202 शहरातील परीक्षा केंद्रावर पार पडली. मगंळवारी सीबीआयनं नागपूरमध्ये छापे टाकले होते.

CBI : नीट परीक्षेतील गैरप्रकार भोवला, नागपुरात 5 विद्यार्थ्यांसह कोचिंग क्लासच्या संचालकाला सीबीआयकडून अटक
प्रातिनिधिक फोटो - cbi
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 2:59 PM

नागपूर: देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचं आयोजन केलं जातं. नागपूरमध्ये नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडं झालं आहे. नीट परीक्षा रविवारी देशभरातील 202 शहरातील परीक्षा केंद्रावर पार पडली. मगंळवारी सीबीआयनं नागपूरमध्ये छापे टाकले होते. आता, नागपूरातील पाच विद्यार्थ्यांना सीबीआयने अटक केल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानं नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. नागपूरमधील एका कोचिंग क्लासेसच्या संचालकालाही सीबीआयनं अटक केल्याचं समोर आलं आहे.

सीबीआयचा कोचिंग सेंटरवर छापा

नीट परीक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याप्रकरणी सीबीआयनं नागपूरमध्ये छापे टाकले होते. नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मेडीकल कॅालेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याचं उघड झालं आहे. दिल्लीतील सीबीआयच्या टीमने नागपूरातील कोचिंग क्लासेसवर छापा टाकला होता.

कोचिंग क्लासेसच्या संचालकाही अटक

सीबीआयनं सक्करदरा परिसरातील कोचिंग क्लासेसच्या संचालकांनाही अटक केल्याची माहिती आहे. 12 सप्टेंबरला झालेल्या नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याप्रकरणी अटक झाली असल्याचं कळतंय.

नागपूरमधील पाच मोठ्या क्लासेसवर सीबीआयचे छापे

नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळं नागपूरमधील कोचिंग क्लासेस प्रकरणी नागपूरातील कोचिंग क्लासेसवर साबीआयनं छापे टाकले होते.सीबीआयनं धाडीत काही कागदपत्र जप्त केल्याची माहिती आहे. नागपूरातील पाच मोठ्या कोचिंग क्लासेसवर सीबीआयच्या धाडी पडल्या होत्या. दिल्लीतील सीबीआयच्या टीमचं धाडसत्र अवलंबलं होतं. नागपुरातील गणेशनगर, नंदनवन, आझमशाहा चौकातील क्लासेसवर छापे टाकण्यात आले होते.

जयपूरमध्येही नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळं 8 जणांना अटक

देशभरात विविध परीक्षा केंद्रावर नीट परीक्षा पार पडली. परीक्षा सुरु असतानाच प्रश्नपत्रिका लीक झाली होती. जयपूर पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. परीक्षार्थीसह पोलिसांनी तिच्या कुटंबातील सदस्य, परीक्षा केंद्र सुपरवायझर आणि इतरांना अटक केली होती. जयपूर पोलिसांनी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाची डील 30 लाखांना ठरल्याची माहिती दिली आहे. जयपूरमध्ये दिनेश्वरी कुमारी ही विद्यार्थिनी, तिचे काका, पर्यवेक्षक राम सिंग, परीक्षा केंद्राचा प्रमुख मुकेश आणि इतर चार जणांना अटक केली आहे. डीसीपी रिचा तोमर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. प्रश्नपत्रिका लीक करण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करण्यात आला. प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलवर काढून सोडवून घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आली, असी माहिती रिचा तोमर यांनी दिली.

पेपर कसा लीक झाला?

रिचा तोमर यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. आरोपी राम सिंग तोमर आणि मुकेश यांनी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले. हे फोटो जयपूरमधील चित्रकूट भागातील एका अप्राटमेंटमधील दोन व्यक्तींना व्हाटसअ‌ॅप द्वारे पाठवण्यात आले. तिथून ते पेपर सिकरमध्ये पाठवण्यात आले. सिकरमध्ये असलेल्या व्यक्तीनं याची उत्तरतालिका चित्रकूटमधील दोघांकडे पाठवली. चित्रकूटमधील दोघांनी ती मुकेश आणि रामसिंगला पाठवली. रामसिंग यानं दिनेश्वरीला पेपर सोडवण्यासाठी उत्तरतालिका देऊन मदत केली, अशी माहिती रिचा तोमर यांनी दिली आहे.

इतर बातम्या:

NEET UG 2021 : नीट परीक्षा यूजी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर केंद्राचा चुकीचा उल्लेख, विद्यार्थ्यांना मनस्ताप

NEET UG 2021: नीट यूजी परीक्षेला आजपासून सुरुवात, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

CBI arrested five students and one Coaching class director for malpractice in NEET UG exam

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.