दिवसा डेकोरेशनच्या कामात व्यस्त, रात्री युवकाचा वाढदिवस साजरा, पहाटे जे घडले त्याने कुटुंबीय हादरले

| Updated on: May 03, 2023 | 5:21 PM

वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजे उमेदीच्या काळात त्याने घेतलेला धोकादायक निर्णय सर्वांच्या मनाला चटका लावून गेला.

दिवसा डेकोरेशनच्या कामात व्यस्त, रात्री युवकाचा वाढदिवस साजरा, पहाटे जे घडले त्याने कुटुंबीय हादरले
Follow us on

नागपूर : वाढदिवस हा सर्वात आनंदाचा क्षण. लहान मुले असो की, मोठे वाढदिवसाची वाट सारेच पाहतात. आपण किती मोठे झालो. काय केलं. आणखी काय करायचं आहे. याचा विचार काही जण करतात. आयुष्य पुन्हा येत नाही. जे मिळालं आहे ते व्यवस्थित जगावं लागतं. पण, एका तरुणाने वाढदिवसाच्या दिवशी भयानक निर्णय घेतला. या निर्णयाने कुटुंबीय आणि नातेवाईक हादरून गेले. आता तो काही परत येणार नाही. पण, वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजे उमेदीच्या काळात त्याने घेतलेला धोकादायक निर्णय सर्वांच्या मनाला चटका लावून गेला.

हिंगणघाटचा तरुण भिवापुरात राहायचा

श्रेणीक बाबाराव लांबाडे हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील २३ वर्षीय तरुण. तो लहानपणापासून भिवापूर येथील ऑफिसर कॉलनीत राहिला. त्याचे मोठे वडील तुकाराम ठाकरे यांच्याकडे शिकला. मध्यंतरी तो शेखापूर येथे आपल्या आईवडिलांकडे गेला होता.

महिनाभरापूर्वी श्रेणीक पुन्हा भिवापूरला आला. श्रेणीक हा अभ्यासात हुशार. रविवारी, ३० एप्रिलला श्रेणीकचा वाढदिवस होता. त्या दिवशी सायंकाळी सात वाजतापर्यंत श्रेणीक डेकोरेशनच्या कामात होता. मेंढेगाव येथे काम सुरू होतं. काम आटोपल्यानंतर तो घरी आला.

हे सुद्धा वाचा

डेकोरेशन व्यावसायिकाला वाढदिवसाला बोलावले

घराशेजारच्या निरंजन बिरे यां डेकोरेशन व्यावसायिकाशी त्याचे चांगले संबंध होते. वाढदिवशी संध्याकाळी श्रेणीकने निरंजन यांच्या कुटुंबीयांना वाढदिवसाला बोलावले. वाढदिवशी तो सर्वांना खुश दिसत होता, असे नातेवाईक सांगितात. कुटुंबीय आणि मित्रांसोबत श्रेणीकने वाढदिवस साजरा केला.

रात्री केक कापला, सकाळी मृतदेह सापडला

केक कापण्यात आला. सेलिब्रेशन झाले. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. पण,श्रेणीक रात्री बारा वाजतापर्यंत मोबाईल पाहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सकाळी त्याचा मृतदेह सापडला. त्यामुळे घरचे सर्व हादरून गेले.

ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी चारच्या दरम्यान उघडकीस आली. श्रेणीक स्टोअर रूममध्ये मृतावस्थेत सापडला. या घटनेने कुटुंबीय हादरले. भिवापूर पोलिसांनी घटनास्थळाची पंचनामा केला.