Nagpur ZP | च्यमनप्राश नाही आता बिटकॉझिंकच्या गोळ्या! कुपोषित, किशोरवयीन, गरोदर मातांचे आरोग्य सुधारणार

या गोळ्यांमध्ये व्हिटॅमीन बी कॉम्पलेक्स, व्हिटॅमीन सी आणि झिंकचा समावेश आहे. लवकरच अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीच्या गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना या अतिरिक्त आहाराचा पुरवठा करण्यात येणार आहे.

Nagpur ZP | च्यमनप्राश नाही आता बिटकॉझिंकच्या गोळ्या! कुपोषित, किशोरवयीन, गरोदर मातांचे आरोग्य सुधारणार
नागपूर जिल्हा परिषद, जि. प.च्या महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 9:13 AM

नागपूर : जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) आदिवासी क्षेत्र उपयोजनांतर्गत (Tribal Area Sub-Plan) गरजूंना आहार पुरविला जातो. या योजनेअंतर्गत आधी च्यवनप्राश देण्याचे नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागानं ठरविले होते. परंतु, त्याला तांत्रिक मान्यता मिळाली नाही. त्यामुळं आता बिटकॉझिंकच्या गोळ्या देण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले आहे. कुपोषित मुले-मुली, किशोरवयीन मुली (Teenage girls), गरोदर व स्तनदा मातांना या योजनेतून अतिरिक्त आहार पुरविला जाणार आहे. जि.प.च्या महिला व बाल कल्याण समितीची बैठक सभापती उज्ज्वला बोढारे (Speaker Ujjwala Bodhare) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

80 लाख रुपयांचा निधी

2021-22 साठी जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना एससीपी) अंतर्गत 50 लाख रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली. आदिवासी क्षेत्र उपयोजना (टीएसपी) अंतर्गत 10 लाख, तर ओटीएसपी अंतर्गत 10 लाख अतिरिक्त आहारावर खर्च करण्यात येणार आहेत. एमएडीए अंतर्गत 10 लाख अशाप्रकारे एकूण 80 लाख निधीतून कुपोषण दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कुपोषित मुले-मुली, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा मातांच्या अतिरिक्त आहाराची ही तरतूद करण्यात आली आहे.

अतिरिक्त आहाराचा पुरवठा

पोषक आहारासाठी बिकॉझिंक गोळ्या देण्याच्या योजनेला जि. प.च्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या ईएसआयसी नवी दिल्ली कार्याकडून ई-निविदा दरकरार मंजुरी प्राप्त झाली आहे. कळमेश्‍वर येथील झिम लेबॉरट्रीज लिमिटेड यांच्याकडील बिकॉझिंक गोळ्या देण्यात येणार आहेत. या गोळ्यांमध्ये व्हिटॅमीन बी कॉम्पलेक्स, व्हिटॅमीन सी आणि झिंकचा समावेश आहे. लवकरच अनुसूचित जाती व अनुसूचित जनजातीच्या गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना या अतिरिक्त आहाराचा पुरवठा करण्यात येणार आहे.

Nagpur Crime : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून कामगाराचे साहित्य चोरले, आरोपी अटक

4 कोटी 20 लाखांच्या हवालाच्या पैशांचा तपास ईडीकडे? नागपूर पोलिसांचं पत्र

Nagpur | महादेवाचा नंदी दूध आणि पाणी पितो? नागपुरात पसरली अफवा, सिद्ध करणाऱ्यास ‘अंनिस’कडून 25 लाखांचे बक्षीस

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.