शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी? Chandrasekhar Bavankule यांनी सांगितलं कारण
राज्य सरकारमधील 75 टक्के आमदार नाराज आहेत, असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विशेषता काही शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना निधी कमी दिला जात असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केलाय.
नागपूर : या राज्यात शिवसेनेमध्ये 90 टक्के खासदार आणि 75 टक्के आमदार नाराज आहेत. बजेटच्या माध्यमातून विचार केला तर, मंत्री आणि त्यांच्या जवळचे आमदार यांच्यासाठी बजेट तयार करण्यात आलाय. शिवाय पैशामधून कमिशन मिळेल, अशा ठिकाणी बजेट आहे. बजेट हे दुराग्रही भावनेनं तयार करण्यात आलंय. बाकी आमदारांना काहीच मिळालं नाही. त्यामुळं त्यांच्या मतदारसंघाचा विकास होणार नाही. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेस तसेच शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांत वाद होणार आहे. त्यांच्यात लढाई सुरू आहे. जसजसे दिवस पुढं जातील, तसतसे असुरक्षित वातावरण तयार होत आहे. राज्यात राजकीय असुरक्षितता तयार झाली आहे, असा आरोप भाजपचे विधानपरिषदेचे आमदार (BJP MLA of Legislative Council) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केलाय.
राष्ट्रवादीचे आमदार खुश
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मतदारसंघात विकासकामे झाली नाहीत. त्यामुळं काँग्रेस आणि शिवसेनेच्या पातळीवर आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादी मात्र खूश आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. शिवसेना आणि काँग्रेसमधील आमदार नाराज ठेवायचं. राष्ट्रवादीचे आमदार स्वयंपूर्ण करायचं. मी राष्ट्रवादीत आहे. मला किती पैसे मिळाले बघ. तुला तुझ्या मतदारसंघासाठी किती पैसे मिळाले. यावरून वाद निर्माण करायचा. एकंदरित शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना अस्वस्थ करून राष्ट्रवादीला वाढवायंच. अशाप्रकारचा प्रयत्न सुरू आहे, असंही बावनकुळे म्हणाले. राज्य सरकारमधील 75 टक्के आमदार नाराज आहेत, असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विशेषता काही शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना निधी कमी दिला जात असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केलाय.