छगन भुजबळ यांचा गुलाबराव पाटील यांना टोला; तुम्ही जिथून शिक्षण घेतले तिथले ‘ते’ हेडमास्टर

तुम्ही ठाकरे यांच्या सभेत घुसून दाखवा कसे बाहेर पडता ते आम्ही बघू असा दमही ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला. या सर्व प्रकरणानंतर छगन भुजबळ यांनी नागपुरात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांचा गुलाबराव पाटील यांना टोला; तुम्ही जिथून शिक्षण घेतले तिथले 'ते' हेडमास्टर
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 9:36 PM

नागपूर : जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची सभा उधळण्याची भाषा केली. त्यावरून ठाकरे गट आक्रमक झाला. तुम्ही सभेत घुसून दाखवाचं, असे आव्हान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिले. शिवाय सभेत घुसून दाखवा आम्ही तुम्हाला ५१ हजार रुपयांचे बक्षीस देऊ, असंही जाहीर केलं. त्याचबरोबर तुम्ही ठाकरे यांच्या सभेत घुसून दाखवा कसे बाहेर पडता ते आम्ही बघू असा दमही ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला. या सर्व प्रकरणानंतर छगन भुजबळ यांनी नागपुरात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, गुलाबराव पाटील तुम्ही दगड मारून सभा उधळणार असाल, तर त्या सभेत येणारे लोकं काही कमी नाहीत. जिथून तुम्ही हे शिक्षण घेतले तिथले हेडमास्टरच उद्धव ठाकरे आहेत.

मराठा समाजाला आरक्षण द्या, आमचा विरोध नाही. मात्र, ते आरक्षण ओबीसीमधून नको. ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये आधीच खूप गर्दी झाली आहे. इतर अनेक जातींना ओबीसीमधून आरक्षण दिले. त्यामुळे आधीच ओबीसी समाजासाठी फक्त 17 टक्केच आरक्षण शिल्लक राहिले आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तर ओबीसी समाज जाणार कुठे?

अशात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास ओबीसी जाणार कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा नेत्यांनाही इतर समाजातील वाट्यातून आरक्षण नको आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घटनात्मक दुरुस्ती करून एकूण आरक्षण 50 टक्केच्या वरती न्यावं.

मराठा समाजाला 50% च्या वरती अतिरिक्त दहा टक्के आरक्षण द्यावे. मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण दिलं आणि सर्व मागासलेले समाज 50% च्या आरक्षणामध्ये सामावून घेण्यात आले. तर उर्वरित पन्नास टक्के आरक्षण कोणासाठी शिल्लक राहणार आहे. याचाही विचार होण्याची गरज आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

कोणालाही प्रगती होणार असेच वाटेल

मीडियाच्या लोकांनी प्रश्न विचारला म्हणून अजित पवारांनी तसे उत्तर दिले. कोणालाही राजकारणात आपली प्रगती व्हावी असेच वाटणार ना. असं म्हणत अजित पवार यांनी छगन भुजबळ यांनी पाठराखण केली. मला आता मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे अजित पवार एका मुलाखतीत म्हणाले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.