मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांची भेट, प्रताप सरनाईक म्हणतात, राज ठाकरे…

| Updated on: Dec 23, 2022 | 6:49 PM

हजारो लोकं अधिवेशनात येतात. कॅमेरे लागलेले आहेत. त्यामुळं ते खुलेआम भेटलेत. या योगायोग आहे, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांची भेट, प्रताप सरनाईक म्हणतात, राज ठाकरे...
प्रताप सरनाईक
Follow us on

नागपूर : आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहा मिनिटं बंदद्वार चर्चा झाली. यावर बोलताना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक म्हणाले, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे काही पहिल्यांदा भेटलेले नाहीत. दिवाळीच्या कार्यक्रमात तसेच वेडात वीर दौडले सात या कार्यक्रमात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. या भेटीगाठी काही नवीन नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना राज ठाकरे हे भेटले असतील तर त्यात काहीही वावगं नाही.

बंददाराआड चर्चा झाली. यावर बोलताना प्रताप सरदेसाई म्हणाले, लोकांमध्ये बसून बोलणार नाहीत. विधिमंडळाचं अधिवेशन नागपुरात सुरू आहे. येथे मुख्यमंत्र्यांशी महापालिका निवडणुकीची चर्चा करायला कोणी येणार नाही.

मनसेप्रमुख राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. त्यांचा मोठा पक्ष आहे. किमयागार नेता म्हणून त्यांची देशात ओळख आहे. दोन मोठे नेते भेटतात, तेव्हा चहापानाचा कार्यक्रम होतो. नागपुरातील ऑरेंज ज्युस, संत्राबर्फी अशा नावीन्यपूर्ण पदार्थांवर ताव मारला जातो, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून राज्याचे दोन नेते एकत्र आले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चा करतात. नागपुरात नवनिर्माण सेनेचे शिबिर होतं. योगायोगानं अधिवेशनाच्या या आठवड्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळं या दोघांची भेट झाली.

प्रताप सरनाईक म्हणाले, मनपा निवडणुकीच्या युतीची चर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होईल, असं मला वाटतं नाही. तशी चर्चा होणार असेल तर खुलेआम होईल. हजारो लोकं अधिवेशनात येतात. कॅमेरे लागलेले आहेत. त्यामुळं ते खुलेआम भेटलेत. या योगायोग आहे, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.