हिंगणघाटच्या पीडितेला राज्य सरकार विसरलं, दिशा कायद्याचं काय झालं, चित्रा वाघ यांचा सवाल
भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी हिंगणघाट जळीतकांड घटनेमध्ये जीव गमावणाऱ्या पीडितेला सरकार विसरले, अशी टीका केलीय. Chitra Wagh Maha Vikas Aghadi Hinganghat
वर्धा : भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी हिंगणघाट जळीतकांड घटनेमध्ये जीव गमावणाऱ्या पीडितेला सरकार विसरले, अशी टीका केलीय. नेहमी ट्विट करणार हे सरकार हिंगणघाटच्या पीडितेला आंदराजंली वाहण्यास विसरल्याचंही त्या म्हणाल्या. वाघ यांनी यावेळी बोलताना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. महिला अत्याचारांच्या घटनांबद्दल सरकारला गांभीर्य नाही. दिशा कायद्याचं काय झालं असा सवालही चित्रा वाघ यांनी केला. (Chitra Wagh criticize MahaVikas Aghadi Government over Hinganghat victim justice and Disha Act)
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाहिली पिडीत शिक्षिकेला श्रद्धांजली
पेट्रोल टाकून ज्या पीडित शिक्षिकेला जाळण्यात आलं, त्या पीडितेच्या वेदनेला सरकार विसरले आहे. नेहमी ट्विट करणारे सरकार साधे श्रद्धांजली देऊ शकले नाही, लेखी आश्वासन दिले होते तेही सरकार विसरल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. महाराष्ट्र सरकार मधील गृहमंत्री बलात्काऱ्यांना क्लीन चिट देत फिरत आहेत, अशी टीका भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
हिंगणघाट येथील निर्भया जळीतकांड दुर्दैवी घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालंय
एका वर्षात नेमकं काय बदललं? ना कडक कायदे झाले,ना सामाजिक जागृती झाली
आज पुन्हा हिंगणघाटला जात असताना हे प्रश्न मनात अस्वस्थता निर्माण करताहेत @BJP4Maharashtra @bjp4mumbai @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 10, 2021
सरकारनं पीडित तरुणीच्या कुटुंबाच्या मागण्या पूर्ण कराव्यात
हिंगणघाट येथील महाविद्यालयात पीडित प्राध्यापिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली. चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांवर टीका करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. पीडितेला न्याय मिळणं महिलांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, असे सांगून त्यांनी पीडितेच्या कुटुंबाच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी वाघ यांनी करण्यात आली.
हिंगणघाट जळीत प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत आहे. हिंगणघाटच्या नांदोरी चौकात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलेल्या पीडित शिक्षिकेचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. त्या पीडित शिक्षिकेला ती ज्या महाविद्यालयात शिकवत होती त्या विद्या विकास महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मौन पाळत श्रद्धांजली वाहिली.
हिंगणघाटच्या न्यायालयात सरकारी वकील उज्वल निकम यांच्या माध्यमातून पीडित शिक्षिकेला न्याय मिळावा, यासाठी बाजू मांडली जात आहे. तिच्या स्मरणात आज हिंगणघाट येथे आदरांजली वाहण्यात आली, यावेळी भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ, आमदार समीर कुणावर , संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. हिंगणघाटच्या नांदोरी चौकात ज्या ठिकाणी ही घटना घडली होती, त्या ठिकाणी देखील श्रद्धांजली वाहण्यात आली.
नक्की काय घडलं हिंगणघाटमध्ये?
हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता 3 फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.
संबंधित बातम्या:
हिंगणघाट जळीतकांड : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी, उज्ज्वल निकमांचंही काम सुरु : गृहमंत्री
आरोपीला लोकांमध्ये सोडा, तरच मुलीच्या आत्म्याला शांती, हिंगणघाट पीडितेच्या वडिलांचा आकांत
(Chitra Wagh criticize MahaVikas Aghadi Government over Hinganghat victim justice and Disha Act)