शिंदे सरकारचं सारथ्य फडणवीसांच्या हाती; झिरो मैल ते शिर्डी प्रवास; गाडी चालवून पाहणी

लोकांसाठीच रस्ता उघडला जात आहे. त्यापूर्वी आम्ही त्याची पाहणी करणार आहोत. या महामार्गामुळे जनतेला वेगाने प्रवास करता येणार आहे.

शिंदे सरकारचं सारथ्य फडणवीसांच्या हाती; झिरो मैल ते शिर्डी प्रवास; गाडी चालवून पाहणी
शिंदे सरकारचं सारथ्य फडणवीसांच्या हाती; झिरो मैल ते शिर्डी प्रवास; गाडी चालवून पाहणीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 1:07 PM

नागपूर: राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आलं. या सरकारमध्ये शिंदे गटाकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. शिंदे सरकारवर अंकूश ठेवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात घेतल्याची चर्चा होती. फडणवीस पत्रकार परिषदेत अधूनमधून एकनाथ शिंदे यांना ब्रिफिंग करताना दिसतात. तर कधी मुख्यमंत्री बोलत असताना मध्येच पत्रकारांना माहिती देतात. त्यामुळे शिंदे सरकारचं सारथ्य फडणवीसांच्या हाती आहे का? अशी चर्चा सुरू असते. आज मात्र, कारमधून एकत्र प्रवास करताना फडणवीस यांनी खरोखरच एकनाथ शिंदे यांचं सारथ्य केलं. फडणवीस यांनी स्वत: कार चालवली. तर त्यांच्या बाजूला शिंदे बसले होते. त्यामुळे शिंदे सरकारचं सारथ्य फडणवीसांच्याच हाती आहे का? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

पंतप्रओधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाला हिरवा कंदिल दाखवला जाणार आहे. त्यापूर्वी या महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही नेत्यांनी नागपूरच्या झिरो मैलपासून ते शिर्डीपर्यंतचा 586 किलोमीटरचा प्रवास कारने सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही एकाच कारने हा प्रवास करत आहे. स्वत: फडणवीस कार चालवत आहेत. तर शिंदे त्यांच्या बाजूला बसले आहेत. दोन्ही नेते आलटूनपालटून कार चालवणार आहेत. राज्यातील जनतेसाठी हा महामार्ग खुला होणार आहे. तो व्यवस्थित आहे की नाही, हे पाहण्यासाठी ही टेस्टिंग सुरू आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा प्रवाससुरू झाला आहे. त्यांच्या ताफ्यात एकूण 8 वाहने आहेत. एक रुग्णवाहिकाही सोबत आहे. ताफ्यात सर्वात आधी पोलीसांची वॅार्निंग कार, मग पायलट, व्हीआयपी कार, रिंग राऊंड, 1,2,3 कार त्यानंतर स्पेअर कार आहेत. दोन्ही नेते प्रवास करत असल्याने पोलिसांवर मोठी जबाबदारी आली आहे.

हा प्रवास सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस कार चालवत आहेत. त्याचा आनंद वाटतो. हा वेगळा आनंद आहे आणि मोठा आनंद आहे. मीही कार चालवणार आहे. मी अगोदर ट्रायल घेतली आहे. 120च्या स्पीडने आम्ही कार चालवणार आहोत. नियम पाळूनच कार चालवणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

लोकांसाठीच रस्ता उघडला जात आहे. त्यापूर्वी आम्ही त्याची पाहणी करणार आहोत. या महामार्गामुळे जनतेला वेगाने प्रवास करता येणार आहे. या रस्त्यावरील वेग जसा वाढणार आहे, त्याच वेगाने सरकार काम करत आहे. यापुढेही वेगाने काम सुरू राहील. उद्घाटन झाल्यावर आणखी वेगाने सुरू राहील, असं शिंदे यांनी सांगितलं.

तर, हा महामार्ग खुला झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्याचा प्रचंड विकास झालेला पाहायला मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

महामार्गाचे वैशिष्ट्ये

  1. 120 च्या स्पीडने प्रवास करता येणार
  2. 8 तासात प्रवास होणार
  3. मालवाहतूकही 16 तासात होणार
  4. नागपूरला मुंबईला जोडता येणार
  5. महामार्गावर एकूण 24 ठिकाणी टोलनाके
  6. नागपूरच्या मिहान प्रकल्पाशी अनेक जिल्हे जोडले जाणार
  7. अनेक पर्यटन स्थळे परस्परांना जोडली जाणार
  8. लोणार सरोवर, अजिंठा वेरूळ लेणी, पेंचप्रकल्प जोडले जाणार
  9. 18 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र असणार
  10. रोजगाराच्या संधी निर्माण होणार
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.