Eknath Shinde : ठाकरे गटाच्या जखमी कार्यकर्त्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून; मविआच्या सभेला जात असताना अपघात
16 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला जात असताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा अपघात झाला आहे.
नागपूर : नागपूर येथे महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेची आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. विदर्भातील आघाडीची ही पहिलीच सभा असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले होते. मात्र, या कार्यकर्त्यांचा भीषण अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. ही माहिती मिळताच पक्षभेद विसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेले. या कार्यकर्त्यांवर तातडीने उपचार करण्याचे आदेशच त्यांनी डॉक्टरांना दिले. शिंदे यांचा हा दिलदारपणा पाहून त्यांचं कौतुक होत आहे.
महाविकास आघाडीची 16 एप्रिल रोजी सभा होणार आहे. या वज्रमूठ सभेची महाविकास आघाडीने जय्यत तयारी सुरू केली आहे. सभेसाठी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले होते. पण समृद्धी महामार्गावर या कार्यकर्त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यात दोन जण जागीच ठार झाले. तर काही कार्यकर्ते जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून जखमी कार्यकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या कार्यकर्त्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षभेद विसरून या कार्यकर्त्यांना मदत केल्याने मुख्यमंत्र्यांच्या या दिलदार वृत्तीचं स्वागत होत आहे.
मैदानाचा वाद कोर्टात
दरम्यान, नागपूरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. महाविकास आघाडीच्या सभेला तीन दिवस शिल्लक आहेत. पण अद्याप नंदनवन पोलीस परवानगी मिळालेली नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभेसाठी दिलेल्या मैदानाचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. आघाडीच्या सभेची परवानगी रद्द करण्यासाठी स्थानिक नागरिकांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दर्शन कॅालनी मैदान खेळासाठी आरक्षित असल्याने महाविकास आघाडीच्या सभेची परवानगी रद्द करण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे.
आज याचिकेवर सुनावणी
आज या याचिकेवर पहिल्या सत्रात सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. दर्शन कॅालनी मैदान बचाव समितीने ही याचिका दाखल केली आहे. स्थानिक नागरिक धिरज शर्मा, गजानन देवतळे आणि रोशन आकरे यांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची याचिकाकार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.