सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार; आमदाराच्या दाव्याने खळबळ

येणाऱ्या काळात शिवसेना भवन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आले पाहिजे. शिंदे यांच्याकडे शिवसेना भवन येईल आणि ते ताब्यात घेतील. शिवसेना भवन लिगली शिंदे गटालाच मिळेल.

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार; आमदाराच्या दाव्याने खळबळ
एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 11:49 AM

नागपूर: शिंदे गटाने काल मुंबई महापालिकेत जाऊन शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता शिंदे गट शिवसेना भवन ताब्यात घेणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आता अमरावतीचे आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेतील. उद्धव ठाकरे स्वत: त्यांना शिवसेना भवनाची चावी देतील, असा दावाच रवी राणा यांनी केला आहे. रवी राणा यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राणा यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

उद्धव ठाकरेंचे नगरसेवक महापालिकेतील शिवसेनेच्या ऑफिसात बसून टक्केवारीचं राजकारण करत होते. शिवसेनेच्या कार्यालयाचा दुरुपयोग होत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं. महापालिकेवर प्रशासक आहे. नगरसेवकांचं नगरसेवकपद राहिलेलं नाही. असं असतानाही कार्यालयात बसून टक्केवारीचं काम केलं जात होतं.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे ते मोडून काढण्यासाठी महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयाला सील लावण्यात आलं. त्यामुळे टक्केवारीचा धंदा बंद होईल, असा दावा रवी राणा यांनी केला.

येणाऱ्या काळात शिवसेना भवन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आले पाहिजे. शिंदे यांच्याकडे शिवसेना भवन येईल आणि ते ताब्यात घेतील. शिवसेना भवन लिगली शिंदे गटालाच मिळेल. बहुमत शिंदेंकडे आहे. त्यामुळे सेना भवन शिंदेंना मिळेल. उद्धव ठाकरे यांनाच शिंदे यांना चावी द्यावी लागणार आहे, असा दावाही राणा यांनी केला.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे राहिलेले नाहीत. ते सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या विचाराचे झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा विचार अंगीकारून बाळासाहेबांच्या विचाराची हत्या केली आहे म्हणून एकनाथ शिंदे यांच्या सारखा बाळासाहेबांच्या विचारांचा खरा शिवसैनिक बाहेर आला आहे, असं ते म्हणाले.

शिवसेना भवन हे पक्षाच्या नावाने आहे. जेव्हा पक्षाचे बहुमत ज्याकडे असते त्याच्याकडे पक्षाचा ताबा मिळतो. शिंदे यांच्याकडे 80 ते 90 टक्के पक्ष आहे. शिंदेंनी ते सिद्धही केलं आहे. 40 आमदार शिंदे गटात आले आहेत. अनेक नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे गटात आले आहेत. त्यामुळे शिंदे यांना शिवसेना भवन मिळण्यात काहीच अडचण नाही, असा दावाही त्यांनी केला.

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर अनेक नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून येतील. 80 ते 90 टक्के माजी नगरसेवक शिंदेकडे येतील. आणि शिंदेंचा झेंडा महापालिकेवर फडकेल, असं ते म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.