‘टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट: भंडारा दुर्घटना चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून डॉ. साधना तायडेंना हटवले, मुख्यमंत्र्यांची माहिती
भंडारा दुर्घटना प्रकरणी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. Uddhav Thackeray Bhandara Fire
भंडारा: जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डला (CM Uddhav Thackeray Bhandara Visit) शुक्रवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत 17 नवजात बाळांपैकी 10 बालकांचा मृत्यू झाला. सरकारने या बालकांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी भंडाऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भंडारा दुर्घटनेच्या चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून डॉ. साधना तायडे यांना हटवले असल्याची घोषणा केली. नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भंडारा दुर्घटने प्रकरणी ‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून आला आहे. (CM Uddhav Thackeray declare Nagpur Divisional Commissioner will inquire Bhandara Hospital fire incident)
डॉ.संजीव कुमार यांच्याकडे जबाबदारी
भंडारा जिल्हा रुग्णालयात 10 नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी डॅा. साधना तायडे यांच्या नेतृत्त्वात समिती बनवल्याची काल आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली होती. आरोग्य संचालक डॅा. साधना तायडे यांच्या ऐवजी नागपूर विभागीय आयुक्त चौकशी समितीची जबाबदारी सांभाळणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. नागपूरचे विभागीय आयुक्त डॅा. संजीव कुमार यांच्यावर चौकशी समितीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भंडारा येथील जिल्हा रुग्णालय आणि भोजापूरमधील मृत बालकाच्या घरी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांसोबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.
टीव्ही 9 मराठीच्या बातमीची दखल
आरोग्यविभागात मे 2020 चा अग्निशमन उपकरणासाठी 1 कोटी 52 लाखांचा प्रस्ताव सात महिने धूळखात का होता? ही बातमी ‘टीव्ही 9 मराठी’ने सर्वात आधी दाखवली होती. टीव्ही 9 मराठीच्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मी आताच पीडित कुटुंबीयांना भेटलो. हात जोडून उभं राहण्याशिवाय मी काहीच करू शकलो नाही. सांत्वन करता येईल असे शब्दच माझ्याकडे नव्हते, असे भावुक उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. भंडार दुर्घटनेतील कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री अत्यंत भावूक झाले होते. ही दुर्घटना आम्ही अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अधिकारी प्रभात रहांगदळे या चौकशी समितीत असतील. ही दुर्घटना नेमकी कशी घडली हे शोधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा अपघात अचानक घडला की आणखी कोणती कारणं आहेत, हे तपासलं जाईल. घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना काळात इतर अत्यावश्यक बाबींकडे दुर्लक्ष झालं का? याचीही चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज भंडाऱ्यातील भोजापूर येथे जाऊन दुर्दैवी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत इतकं हे प्रचंड दुःख आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. pic.twitter.com/wQJnTmKpdw
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 10, 2021
संबंधित बातम्या:
Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री
CM Bhandara Visit LIVE | भंडारा दुर्घटनेची चौकशी करणार, दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री
(CM Uddhav Thackeray declare Nagpur Divisional Commissioner will inquire Bhandara Hospital fire incident)