Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली बांधात उतरून रोवणी, कान्हादेवीचे शेतकरी झाले आश्चर्यचकित

भाताची रोवणी करण्यापूर्वी शेताची विशिष्ट पद्धतीने मशागत करणे आवश्यक असते. याला चिखलणी म्हणतात. पूर्वी बैलांच्या मदतीने हे चिखलणी करण्यात येत होती.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली बांधात उतरून रोवणी, कान्हादेवीचे शेतकरी झाले आश्चर्यचकित
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 10:35 PM

नागपूर : जिल्ह्यामध्ये जवळपास ८६ हजार हेक्टरवर भाताची लागवड होणार आहे. भाताची रोवणी आणि त्याआधी शेताची मशागत याचा प्रत्यक्ष अनुभव आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला. तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन त्यांनी जिल्ह्यामध्ये श्री पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. पारशिवणी तालुक्यातील कान्हादेवी येथे राम दशरथ लांजेवार यांच्या शेतावर बेडवर श्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, पारशिवनीचे तालुका कृषी अधिकारी सुरज शेंडे, सरपंच छायाताई मधुकर नेवारे, पोलीस पाटील प्रेमल भोयर, प्रगतिशील शेतकरी श्रावण इडपाची, सूर्यभान राऊत, लक्ष्मण लांजेवार, हेमराज भुतांगे, पी. सी. झेलगोंदे, जे. बी. भालेराव, कृषी सहाय्यक आर. डी. सोरमारे उपस्थित होते.

ITANKAR 2 N

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्वतः धानाच्या बांधीत उतरुन रोप लावणी केली. तसेच श्री. लांजेवार यांच्याकडील जतन करून ठेवलेले राळा, नाचणी, खपली गहू याबद्दल माहिती घेतली. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, फळबाग लागवडीची पाहणी केली.

ट्रॅक्टर चालवून चिखलणी केली

भाताची रोवणी करण्यापूर्वी शेताची विशिष्ट पद्धतीने मशागत करणे आवश्यक असते. याला चिखलणी म्हणतात. पूर्वी बैलांच्या मदतीने हे चिखलणी करण्यात येत होती. आता ट्रॅक्टरच्या मदतीने चिखलणी करण्यात येते. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून चिखलणी करण्याच्या प्रक्रियेत स्वतः सहभाग घेतला. यामुळे शेतकरी आश्चर्यचकित झाले.

श्री पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन

नागपूर जिल्ह्यामध्ये भाताची रोवणी करताना श्री पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः धानाच्या बांध्यामध्ये उतरून लागवड केली. तसेच ट्रॅक्टर चालवून चिखलणी केली. जिल्हाधिकारी स्वतः शेताच्या बांधावर उतरल्याने शेतकऱ्यांना सुद्धा मोठा आनंद झाला.

दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप
दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप.
शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?
शिंदे - ठाकरेंची भेट; सव्वातास चर्चा, युतीवरून डिनर डिप्लोमसी?.
नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान
नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेक; पोलीस जखमी, वाहनांचेही नुकसान.
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.