नागपूर ZP आणि पंचायत समितीसाठी काँग्रेसची मोर्चेबंधणी, इच्छूक उमेदवारांची यादी तयार

नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली तयारी सुरू केली आहे

नागपूर ZP आणि पंचायत समितीसाठी काँग्रेसची मोर्चेबंधणी, इच्छूक उमेदवारांची यादी तयार
CONGRESS
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 11:36 PM

नागपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली तयारी सुरू केली आहे. यासाठी आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मीटिंग ग्रामीण काँग्रेस कार्यालयात घेण्यात आली. यावेळी इच्छूक उमेदवारांची यादीसुद्धा तयार करण्यात आली आहे. (Congress is getting ready for nagpur zp election 2021 and Panchayat Samiti Election)

एकीकडे ओबीसी आरक्षणावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुका पुढे ढकलाव्या, अशी मागणी होत आहे. त्यात काँग्रेससुद्धा अग्रेसर आहे, मात्र नागपुरात काँग्रेसने या निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल, अशी आखणी काँग्रेसने केली आहे.

एकीकडे संघर्ष सुरू असला तरी भूक नको पण शिदोरी असो या म्हणीप्रमाणे आम्ही तयारी करत असल्याचे काँग्रेस नेते व पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यात काँग्रेसप्रमाणे इतर पक्षांनीसुद्धा तयारी सुरू केली आहे, मात्र यात काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.

आघाडीत बिघाडी?

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला उत्तर न दिल्यामुळे शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे सेना, भाजप आणि आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.

शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर नाही

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव स्थानिक शिवसेनेने राष्ट्रवादीला दिला होता. मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला कोणतंही उत्तर दिलं नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 61 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

“म्हणून शिवसेना स्वबळावर लढणार”

शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी दिली. “कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सेना स्वबळावर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे” असं आशिष जैसवाल यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असं चित्र पाहायला मिळणार आहे.

नागपुरातच पटोलेंच्या घोषणेला बगल

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेनंतरही नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीने हातात हात धरला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र पोटनिवडणूक लढवण्याबाबत शिक्कामोर्तब झालं. दोन्ही पक्षात जागावाटपासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे.

नाना पटोलेंचा स्वबळाचा एल्गार

आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला होता.

इतर बातम्या

मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर पतंगबाजी होते; शहा यांच्या भेटीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार: सुभाष देसाई

(Congress is getting ready for nagpur zp election 2021 and Panchayat Samiti Election)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.