“नीरव मोदी, ललित मोदी हे दोघंही ओबीसीचे मोठे नेते”; काँग्रेसच्या नेत्यानं भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली

राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून भाजपने हेच दाखवून दिले आहे की, कायद्याला आम्ही मानत नाही, कायद्याच्या पलिकडे आणि लोकशाही न जुमानता आम्ही देशात काहीही करू शकतो असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

नीरव मोदी, ललित मोदी हे दोघंही ओबीसीचे मोठे नेते; काँग्रेसच्या नेत्यानं भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 10:03 PM

नागपूर : देशातील ओबीसी समाजाचे सगळ्यात मोठे नेते कोण असतील तर ते म्हणजे नीरव मोदी आणि ललित मोदी. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केल्यामुळे भाजपमधील ओबीसी नेत्यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थानाला लुटून गेलेले नीरव मोदी आणि ललित मोदी यांना सन्मानाने भारतात आणण्याची गरज आहे अशी खोचक टीका काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द झाल्याने त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने राज्यात ओबीसी समाजाचा अपमान झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरही विजय वडेट्टीवार जोरदार हल्लाबोल केला आहे.

या आंदोलनाच्या निमित्ताने ललित मोदी आणि नीरव मोदी यांना हिंदुस्थानात परत आणलं पाहिजे कारण हे दोघं नेते ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत.

तसेच देशाला लुटून हे दोन्ही नेते ओबीसीचे नेते पळून गेल्यामुळे भारतातील जनता प्रचंड नाराज झाली आहे.तसेच ओबीसी समाजाला यांच्यामुळे फार मोठ तोटा झाला आहे.

ललित मोदी आणि नीरव मोदी यांनी परत भारतात यावे. पुन्हा आम्ही या दोघांना आम्ही चोर मानणार नाही. या दोघांनाही आम्ही आमचे नेते मानू.

ललित आणि नीरव मोदी तुम्ही कितीही वेळाहिंदुस्थानाला लुटून घेऊन गेला तरी आम्ही तुम्हाला माफ करू असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

ललित आणि नीरव मोदी यांनी भारतात लवकर परत यावे, कारण ओबीसी समाज त्यांची आतुरतेने वाट बघत आहे. राहुल गांधी यांनी या दोघांचा अपमान केल्यामुळे भाजपमधील ओबीसी समाजाचा अपमान झाला आहे.

त्यामुळे सध्या तुमच्या भाषणाची आणि तुमच्या प्रचाराची आता या देशाला गरज आहे. त्यामुळे तुम्ही तात्काळ भारतात या असा टोला मोदी यांना लगावत त्यांनी भाजप आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. सध्या भारताला लुटणाऱ्यांवर टीका करायची नाही.

अशा सरकारमुळेच ललित आणि नीरव तुमची स्वागत करण्याची वेळ आली आहे. भाजपला ही दोन माणसं प्रिय असून या दोन्ही माणसांचे फोटो लावून त्यांचे जोरदार स्वागत केले पाहिजे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. या अशा राजकारणामुळे देशात कुठल्या बाजूने राजकारण चालू झालं ते कळेल.

राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून भाजपने लोकशाही संपवण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला आहे. त्यामुळे देशातील लोकशाहीचा प्रवास हा हुकूमशाहीकडे चालू झाला आहे.

राहुल गांधी यांच्यावर कारवाई करून भाजपने हेच दाखवून दिले आहे की, कायद्याला आम्ही मानत नाही, कायद्याच्या पलिकडे आणि लोकशाही न जुमानता आम्ही देशात काहीही करू शकतो असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.