‘एक तरी द्या हो’, काँग्रेसच्या बड्या नेत्याची राज ठाकरेंवर बोचरी टीका
"आज प्रकाश आंबेडकरांसारखे नेते दिसत नाहीत. त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देऊन उमेदवारला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. शाहू फुले आंबेडकरचा वसा घेण्याचं काम सुरू आहे. या संदर्भात सर्वांनी विचार करावा. नक्कीच त्यातून चांगले रिझल्ट मिळतील"
“विदर्भातील जागा घोषित केल्या आहेत. चंद्रपूरची जागा अजून बाकी आहे. चंद्रपूर ही 100 टक्के जिंकणारी जागा आहे. पूर्वी काँग्रेसचा एक खासदार होता, आता 20 खासदार निवडून येतील. त्याची सुरवात चंद्रपुरातून होईल. हायकमांडला अपेक्षित असा निर्णय होईल. राज्यात की दिल्लीत माझी गरज असेल तर तसा निर्णय होईल” असं विजय वडेट्टीवार म्हणाले. प्रकाश आंबडेकर यांच्याविषयी म्हणाले की, “सोबत एकत्र लढावे अशी इच्छा होती. सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले. प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत. एक अभ्यासू आणि हुशार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघतात. चार जागांचा विचार करावा असं म्हणणं होते, आज प्रकाश आंबेडकरांसारखे नेते दिसत नाहीत. त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देऊन उमेदवारला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. शाहू फुले आंबेडकरचा वसा घेण्याचं काम सुरू आहे. या संदर्भात सर्वांनी विचार करावा. नक्कीच त्यातून चांगले रिझल्ट मिळतील” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
राज ठाकरे यांच्यावर एक तरी द्या हो अशी म्हणायची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली. “रामटेकची जागा काँग्रेस जिंकणार. समोर उमेदवार कोणीही असू दे, धक्कादायक निकाल असेल. भाजपच्या अधपतानाची सुरुवात महाराष्ट्रमधून होईल” असं वडेट्टीवार म्हणाले.
हायकमांडला काय विश्वास दिला?
चंदा घेऊन धंदा करणे हे भाजपचे काम आहे. “मी ओबीसीसाठी लढत आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जी जवाबदारी दिली, ती पार पाडली. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जागा जिंकून देऊ हा विश्वास मी हायकमांडला दिला आहे” असं विजय वेडट्टीवार म्हणाले.