नागपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली असतानाच आता त्यामध्ये काँग्रेसनेही उडी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही आता ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यादेवी होळकर नगर असं नामाकरण केलं गेले आहे. त्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर आणि राज्य सरकारवर तोफ डागली आहे. यावेळी नाना पटोले यांनी ज्याप्रमाणे या सरकारने नामाकरण करण्याचा धडका लावला आहे, त्या प्रमाणे त्यांनी विकास कामंही करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी बोलताना सांगितले की, अहमदनगरच नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्यात आले आहे. हे स्वागतार्हय आहे मात्र राजमाता अहिल्यादेवी यांनी ज्याप्रमाणे समाजाला पुढे घेऊन गेल्या आहेत. त्याप्रमाणे या सरकारने काम करावे, फक्त घोषणा करून काही होणार नाही असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.
राज्य सरकारने अहमदनगरचं नामाकरण केले गेले याचे स्वागतच आहे मात्र या सरकारने अहिल्यामातेप्रमाणे काम करावं तर त्याचे सार्थक होईल असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
औरंगाबाद शहराचे नामाकरण केले तरी त्याचा गोळ अजून सुरुच आहे. त्यामुळे या सरकारने आधी नागरिकांची कामं करावी. हे सरकार फक्त नामाकरण करण्याची कामं आहे कारण या सरकारकडे जनतेसाठी काही काम करावे असं यांच्याकडे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे त्यांनी नामाकरणाचा घोळ घातला आहे.
त्यांच्या या कृत्यामुळे अजून औरंगाबादच्या नावाचा घोळ कायम असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगरचे नामाकरण करण्यावरूनच सरकारवर त्यांनी टीका केली आहे.
मुस्लिम नाव बदलणे हाच त्यांचा उद्देश आहे का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा कोणत्याही जयंतीसाठी हटविले जाणे हे चुकीचे असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.