Nagpur Congress | काँग्रेस सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला देणार करारा जवाब, भाजपच्या अपप्रचाराला कसा करणार विरोध? नागपुरात उद्या संकल्प शिबिर

काँग्रेसही तयारीला लागला आहे. राष्ट्रीय शिबिर घेऊन सोशल मीडियाला अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एकंदरित भाजपला करारा जवाब देण्यासाठी ही सारी खेळी केली जात आहे.

Nagpur Congress | काँग्रेस सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपला देणार करारा जवाब, भाजपच्या अपप्रचाराला कसा करणार विरोध? नागपुरात उद्या संकल्प शिबिर
नागपुरात उद्या संकल्प शिबिरImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 10:51 AM

नागपूर : भाजपकडून काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला आता काँग्रेस करारा जवाब देणार आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेसचे सोशल मीडिया तेवढी स्ट्रॉंग नाही, ती आता काँग्रेस स्ट्रॉंग करणार आहे. त्यासाठीच नागपुरात काँग्रेसचे दोन दिवसीय राष्ट्रीय सोशल मीडिया संकल्प शिबिर (National Social Media Sankalp Shibir) आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिराचे उद्घाटन उद्या शनिवारी 11 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करतील. या शिबिराला काँग्रेसचे महाराष्ट्रातील मंत्री, ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सोशल मीडियामधील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजप नेहमीच काँग्रेसबाबत अपप्रचार करते. खोटा इतिहास सांगते. त्यामुळं त्याला विरोध आणि उत्तर देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचं काँग्रेसच्या महाराष्ट्र सोशल मीडिया विभागाचे (Maharashtra Social Media Department) अध्यक्ष विशाल मुत्तेमवार (President Vishal Muttemwar) यांनी सांगितलं. तसंच आगामी निवडणुकांमध्ये प्रचाराच्या अनुषंगाने या सोशल मीडिया वापर केला जाणार असल्याचंही मुत्तेमवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

भाजप नागपूर शहरात संवाद मोहीम राबवणार

नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे मिशन बुथ मजबुती सुरू झालंय. भाजप नागपूर शहरात संवाद मोहीम राबवणार आहे. केंद्र सरकारची विकासकामं मतदारांपर्यंत पोहोचवणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात नागपुरात भाजप सशक्त बुथ अभियान सुरु करणार आहे. कमजोर बुथवर कार्यकर्ते जोडून शहरातील बुथ मजबूत करणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर भाजपने बुथ सशक्त करण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली.

9 ते 11 जूनदरम्यान नागपुरात अभियान

नागपूर शहरात बूझ अभियान राबविले जात आहे. भाजप सरकारला केंद्रात आठ वर्षे पूर्ण झालीत. केंद्रानं दिलेल्या योजनांचा शहरातील कोणाला फायदा झाला. याचा आढावा, या माध्यमातून घेतला जाणार आहे. आठवड्याभरात प्लानिंग करून 9 ते 11 जूनदरम्यान नागपुरात हे अभियान राबविले जाईल. कमजोर बुथांवर भेट देण्यात येणार आहे. याचा निश्चितच फायदा नागपूर मनपा निवडणुकीत होणार आहे. काँग्रेसही तयारीला लागला आहे. राष्ट्रीय शिबिर घेऊन सोशल मीडियाला अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एकंदरित भाजपला करारा जवाब देण्यासाठी ही सारी खेळी केली जात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.