चंद्रपूर : चंद्रपुर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीचा निकाल हाती आला आहे. या निकालाने काँग्रेसचा गोठ्यात आनंद पसरला. तीन नगरपंचायतींवर काँग्रेसने बहुमत मिळविले. तर दोन नगरपंचायतींमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. भाजपाला केवळ पोंभुर्णा नगरपंचायतीवर बहुमत मिळविता आले. पाच नगरपंचायतींमध्ये भाजपा पिछाडीवर गेली. जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींचे अंतिम निकाल हाती आले आहेत. एकूण 102 जागांपैकी काँग्रेस-53, भाजपला-24, शिवसेना-6, राष्ट्रवादी-8, इतर (अपक्ष) -11 जागा मिळाल्यात. चंद्रपूर जिल्ह्यातील सहा निवडणुकांमध्ये काँग्रेस-भाजपात काट्याची लढत होणार, अशी शक्यता वर्तविली गेली. काँग्रेसचे बडे नेते मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभा गाजविल्यात. वडेट्टीवार यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सावली येथे काँग्रेसने 14 जागा जिंकल्या. भाजपाला येथे तीन जागा जिंकता आल्या. सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसने 13 जागा जिंकल्या. भाजपाला तीन जागांवर समाधान मानावे लागले.
चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभुर्णा हे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्षेत्र आहे. मुनगंटीवारांनी तालुक्याचे रूप पालटले. अनेक विकासकामे केली. मुनगंटीवारांचा कार्यावर पोंभुर्णा शहरवासीयांनी परत एकदा विश्वास टाकला. मुनगंटीवार यांचे कार्यक्षेत्र असलेल्या पोंभुर्णाचा निकालाकडे जिल्हाचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणेच येथे भाजपाने बहुमत मिळविले आहे. 17 पैकी भाजपाचा 10 उमेदवार विजयी झालेत. शिवसेनेने 4 जागा जिंकल्या. काँग्रेसला येथे केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर व्हाईट हाऊसमध्ये परत एकदा भाजपाचीच सत्ता असणार आहे.
1) सिंदेवाही- कॉंग्रेस बहुमत- विजय वडेट्टीवारांचा मतदारसंघ
2) पोंभुर्णा- भाजप बहुमत – सुधीर मुनगंटीवारांचा मतदारसंघ
3) गोंडपिपरी – काँग्रेस मोठा पक्ष – काँग्रेस आमदार सुभाष धोटे
4) जिवती – काँग्रेस-रा.काँ. आघाडी बहुमत – सुभाष धोटेंचा मतदारसंघ
5) सावली – काँग्रेस बहुमत – विजय वडेट्टीवारांचा मतदारसंघ
6) कोरपना – काँग्रेस बहुमत – काँग्रेस आमदार सुभाष धोटे