Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Court | सहमतीने शरीरसंबंध म्हणजे अत्याचार नव्हे, सत्र न्यायालयाचा निर्णय, आरोपी दोषमुक्त

एखाद्या सज्ञान महिलेशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कार नव्हे, असा निर्णय न्यायालयाने दिला. आधी सहमतीने संबंध ठेवायचे आणि नंतर बलात्काराची तक्रार करायची हे योग्य नव्हे, असं न्यायालयानं म्हटलं. त्यामुळं या प्रकरणात आरोपीला निर्दोष सोडण्यात आले.

Nagpur Court | सहमतीने शरीरसंबंध म्हणजे अत्याचार नव्हे, सत्र न्यायालयाचा निर्णय, आरोपी दोषमुक्त
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 1:03 PM

नागपूर : एखादी सज्ञान महिला तिच्या सहमतीने शरीरसंबंध (Consensual intercourse) ठेवते. अशावेळी संबंधित पुरुषाला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी धरता येणार नाही. असे स्पष्ट निर्देश सत्र न्यायालयाने ( Sessions Court) दिलेत. न्यायाधीश सुनील पाटील यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपी सागर चुन्नीलाल दडुरे हे महादुला येथील रहिवासी आहेत. सागर हे एका खासगी कार्यालयात नोकरी करतात. सागर शिक्षण घेत असताना त्यांची एका मुलीशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात (the transformation of friendship into a love affair) झाले. त्यांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले.

लग्नास विरोध झाल्याने तक्रार

सागरचा आणि संबंधित महिलेचा लग्न करण्याचा विचार होता. पण, सागरच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला. त्यामुळं लग्न करू शकले नाही. सागरच्या आईवडिलांना ती मुलगी सून म्हणून नको होती. मुलाकडून लग्नास विरोध झाल्यानं संबंधित महिलेने अत्याचाराची तक्रार नोंदविली. सागरने माझ्यावर बलात्कार केला. माझी फसवणूक केली, अशी तक्रार पोलिसांत दिली.

आरोपीचा फसवणुकीचा विचार नव्हता

पोलीस ठाण्यातून प्रकरण न्यायालयात गेले. दोन्ही वकिलांनी आपापली बाजू मांडली. न्यायालयात सागरचे वकील अॅड. आर. के. तिवारी यांनी सांगितले की, संबंधित महिलेने सहमतीने शरीरसंबंध ठेवले. सागरने काही जबरजस्ती केली नव्हती. सागरचा फसवणूक करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. तिला लग्नाचे कोणतेही आमिष दिले नव्हते. हा दावा सिद्ध झाला. त्यामुळं न्यायालयाने सागरची निर्दोष सुटका केली. एखाद्या सज्ञान महिलेशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कार नव्हे, असा निर्णय न्यायालयाने दिला. आधी सहमतीने संबंध ठेवायचे आणि नंतर बलात्काराची तक्रार करायची हे योग्य नव्हे, असं न्यायालयानं म्हटलं. त्यामुळं या प्रकरणात आरोपीला निर्दोष सोडण्यात आले.

Nagpur Crime | अलविदा स्टेटस ठेऊन डॉक्टरने स्वत:ला संपविले, स्वत:च रुग्णालयात टोचले इंजेक्शन, चिठ्ठीमध्ये लिहिले मृत्यूचे कारण

Nagpur Police | हरविलेले मोबाईल पोलिसांनी शोधले, परत मिळाल्याचा आनंद मालकांच्या चेहऱ्यावर, किती मोबाईल केले परत?

Golwalkar Guruji | माधव गोळवलकर गुरुजी जयंती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.