Amravati cool | ठंडा ठंडा कुल कुल, चिखलदऱ्यात रेकॉर्डब्रेक थंडी; पारा 6.8 अंशावर

माखला व बरमासती परिसरात 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती शहराचे तापमान 7.7 नोंदविले गेले. यामुळं सातपुडा पर्वतरांगेत वसलेला मेळघाट पूर्णता गारठला आहे.

Amravati cool | ठंडा ठंडा कुल कुल, चिखलदऱ्यात रेकॉर्डब्रेक थंडी; पारा 6.8 अंशावर
अमरावती जिल्ह्यात थंडीमुळे धुके पसरले आहे.
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 3:41 PM

अमरावती : जिल्ह्यातील विदर्भाचे नंदनवन असलेल्या पर्यटननगरी चिखलदरा (Chikhaldara) व परिसरात पहाटे पारा 5 ते 6 अंशांपर्यंत खाली घसरला. त्यामुळं कडाक्याची थंडी मेळघाटवासीयांनी (Melghat) अनुभवली. या कडाक्याच्या थंडीतही पर्यटकांचा उत्साह मात्र कायम दिसून आलाय. सध्या थंडीची लाट आली असून, अमरावती शहर व ग्रामीण भागातही थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे.

अमरावतीच्या तुलनेत उंचावर असलेल्या चिखलदरा व परिसरात नेहमीच थंडी अधिक राहते. दरम्यान, सोमवारी सकाळी चिखलदरा व परिसरात पाऱ्याने तर यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचा नीचांक गाठला आहे. आतापर्यंत पारा 5 ते 6 अंशांपर्यंत खाली घसरला नव्हता. कडाक्याच्या थंडीमुळं चिखलदऱ्यात दिवसभर प्रत्येकाच्या अंगात ऊब देणारे कपडे व काही ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून आले. बोचरी थंडी असल्यामुळे थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक चिखलदऱ्यात पोहोचले आहेत. थंडीत पर्यटकांचा उत्साह दिसून आला.

मेळघाट गारठले

आणखी दोन दिवस पारा 10 अंशांच्या खालीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. मंगळवारी सकाळी सात वाजता सात अंश तापमानाची नोंद झाली होती. तर परिसरातील माखला व बरमासती परिसरात 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावती शहराचे तापमान 7.7 नोंदविले गेले. यामुळं सातपुडा पर्वतरांगेत वसलेला मेळघाट पूर्णता गारठला आहे. कुडकुडत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक घराबाहेर गरम कपडे अंगावर घालताना दिसत आहेत.

दिवसा पेटतात शेकोट्या

सकाळी किंवा संध्याकाळी लोक घराबाहेर निघणे टाळतात. तर थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून दुपारी शेकोट्या पेटविल्या जात असल्याचं चित्र आहे. आदिवासी नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी चुलीजवळ आश्रय घेतात. गेल्या चार दिवसांपासून थंडीमुळं पर्यटकांच्या संख्येतही घट झाली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या बारा वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात थंडी पडली नव्हती. यंदाची थंडी ही गेल्या बारा वर्षातली रेकॉर्ड ब्रेक थंडी आहे.

Nagpur | महिन्याभरापासून चर्चा मगरीची! वन विभागाचं मिशन मगर; नाग नदीत लावले पिंजरे, ट्रॅप कॅमेरे

Nagpur RSS | हैदराबादचे भाग्यनगर असं नामकरण? आरएसएसच्या टि्वटर हँडलवर उल्लेख; पाच ते सात जानेवारीला भाजपसोबत बैठक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.