नागपुरात 12 ते 14 वर्ष वयोगटाचे Corona प्रतिबंधक लसीकरण सुरू, शहरातील कोणत्या केंद्रांवर व्यवस्था?

कोरोना रुग्णांची संख्या नगण्य असली, तरी काळजी घेणे आवश्यक आहे. आता नागपुरात 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचेही लसीकरण आजपासून सुरू झाले आहे. याला लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

नागपुरात 12 ते 14 वर्ष वयोगटाचे Corona प्रतिबंधक लसीकरण सुरू, शहरातील कोणत्या केंद्रांवर व्यवस्था?
नागपुरात 12 ते 14 वर्ष वयोगटाचे Corona प्रतिबंधक लसीकरण सुरू झालंय.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 11:12 AM

नागपूर : नागपूर शहरातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना गुरुवार 17 मार्चपासून कोर्बेव्हॅक्स (Corbevax) लस दिली जाणार आहे. शहरातील शासकीय आणि मनपाच्या 17 केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी (Additional Commissioner Ram Joshi) यांनी दिली. बुधवारी राज्य शासनाकडून कोर्बेव्हॅक्स लस मनपाला प्राप्त झाली. शहरातील शासकीय व मनपाच्या 17 केंद्रांवर 1 जानेवारी 2008 ते 17 मार्च 2010 दरम्यान जन्मलेल्या मुले/मुलींना ही लस देण्यात येईल. यासाठी त्यांना आपले आधार कार्ड किंवा जन्मतारीख नोंद असलेले शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू ॲपवर (Arogya Setu App) नोंदणी करून किंवा ऑन स्पॉट नोंदणी करण्याची मुभा राहील. लस घेण्यासाठी मुलांचे 12 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून मान्यताप्राप्त कोर्बेव्हॅक्स लसीचे दोन डोस दिले जातील. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी 4 आठवड्यांचे अंतर असणे आवश्यक असल्याचेही अतिरिक्त राम जोशी यांनी सांगितले.

झोननिहाय लसीकरण केंद्र

  • लक्ष्मीनगर झोन क्र.1 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोटर्स कॉम्प्लॅक्स दीक्षाभूमी व जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र.
  • धरमपेठ झोन क्र. 2 : बुटी दवाखाना, सदर रोग निदान केन्द्र व तेलंगखेडी आयुर्वेदिक दवाखाना.
  • हनुमाननगर झोन क्र. 3 : मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र.
  • धंतोली झोन क्र. 4 : आयसोलेशन हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल.
  • नेहरूनगर झोन क्र. 5 : ताजबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र.
  • गांधीबाग झोन क्र. 6 : राजकुमार गुप्ता समाजभवन.
  • सतरंजीपुरा झोन क्र. 7 : मेंहदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र.
  • लकडगंज झोन क्र. 8 : डिप्टी सिग्नल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हिवरीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र.
  • आशीनगर झोन क्र. 9 : पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल.
  • मंगळवारी झोन क्र. 10 : डिव्हीजनल रेल्वे हॉस्पिटल व इंदोरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.