Nagpur Budget | प्रशासक आज मनपाचा अर्थसंकल्प सादर करणार; नागपूरच्या बजेटकडं सर्वांच्या नजरा
मनपा आयुक्तांकडं सध्या प्रशासकाची (administrator) जबाबदारी आहे. त्यामुळं राजकीय धुरिणांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडं लागून राहिल्यात. या अर्थसंकल्पात कपात केली जाण्याची शक्यता आहे. आयुक्तांकडून स्थायी समितीकडं अर्थसंकल्प सादर होतो.
नागपूर : नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प 13 एप्रिल रोजी सादर होत आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Commissioner Radhakrishnan b.) हे 2020-21 चा सुधारित आणि 2022-23 चा अर्थसंकल्प (Budget) सादर करतील. मनपा आयुक्तांकडं सध्या प्रशासकाची (administrator) जबाबदारी आहे. त्यामुळं राजकीय धुरिणांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडं लागून राहिल्यात. या अर्थसंकल्पात कपात केली जाण्याची शक्यता आहे. नियमानुसार, आयुक्तांकडून स्थायी समितीकडं अर्थसंकल्प सादर होतो. पण, यंदा नगरसेवकांचा कालावधी 4 मार्च रोजी संपला. त्यामुळं आयुक्तच अर्थसंकल्प सादर करतील. महापालिकेचा 2022-23 चा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा प्रशासक सादर करणार आहेत. मनपा पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानं सर्व अधिकार प्रशासकाच्या हातात आहे. प्रशासक म्हणून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी काम पाहत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प हा पारदर्शक व गतीमान प्रशासनाची अपेक्षा असलेला राहणार आहे.
गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प 2,796 कोटी रुपयांचा
मागील वर्षी दोन हजार 607 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मनपा आयुक्तांनी सादर केला होता. पण, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी यामध्ये 189 कोटींची वाढ केली होती. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प हा दोन हजार 796 कोटी रुपयांचा झाला होता. पण, मनपाच्या तिजोरित अपेक्षित महसूल जमा झाला नाही. आज सादर होणारा अर्थसंकल्प दोन हजार सहाशे ते सातशे कोटी रुपयांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी स्थायी समितीने मालमत्ता करातून 332 कोटी रुपये महसूल मिळतील, असा अंदाज होता. परंतु, प्रत्यक्षात 215 कोटी जमा झाले. 117 कोटी रुपये उत्पन्न मालमत्ता करातून कमी झाले.
कायमस्वरुपी उत्नन्नाच्या स्त्रोतांवर भर
नगर रचना विभागाचे 106 कोटी उत्पन्न अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात 175 कोटी रुपये जमा झाले. नगर रचना विभागाकडून चांगले उत्पन्न मिळाले. पाणीपुरवठा व इतर विभागांकडून फारसे उत्पन्न मिळू शकले नाही. मनपा आयुक्तांना विद्युतीकरण, उद्यान, विकास, शिक्षण, रस्ते, फुटपाथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलनिस्सारण, परिवहन आदी नागरी सुविधांची पूर्तता करावी लागेल. कायमस्वरुपी उत्नन्नाचे स्त्रोत तयार करण्याचे काम केले जाईल. मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता निर्णय घ्यावा लागेल.
Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी