Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OBC Reservation | दोन आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे कोर्टाचे आदेश; देवेद्र फडणवीस म्हणतात, हे तर महाविकास आघाडीचे अपयश

फडणवीस म्हणाले, योग्य भूमिका महाविकास आघाडी सरकारने कधीच मांडलेली नाही. जी कार्यवाही करायला हवी होती, ती सुद्धा केलेली नाही. हा संपूर्ण निकाल आम्ही समजून घेऊ आणि त्यानंतर पुढील भूमिका मांडू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

OBC Reservation | दोन आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे कोर्टाचे आदेश; देवेद्र फडणवीस म्हणतात, हे तर महाविकास आघाडीचे अपयश
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 4:25 PM

नागपूर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self Government) निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) दिला तेव्हा तरीही राज्य सरकार याबाबत चालढकलपणा केला. त्यानंतर आता बुधवारी सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करावा, असे आदेश दिले आहेत. याबद्दल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अद्याप मी पाहिलेला नाही. पण, प्राथमिक माहितीनुसार, कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण झाला आणि 6 महिन्यांहून अधिक प्रशासक (Administrator) ठेवता येत नाही. या कारणामुळे अशा सर्व ठिकाणी निवडणुका जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे संपूर्णत: महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. दोन वर्षे या सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले. ट्रिपल टेस्ट केली नाही. त्यामुळेच अशाप्रकारचा निकाल आला. न्यायालयाने नवीन कायदा रद्द केला नाही. पण, सरकारच्या कार्यपद्धतीवर मात्र तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

निकाल समजून घेऊन भूमिका मांडू

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे राज्य निवडणूक आयोगाला येत्या दोन आठवड्यांत महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर करावा लागेल. या निर्णयामुळे ओबीसींचे नुकसान होणार आहे. त्यांना पुरेशा जागा राखीव मिळणार नाही. फडणवीस म्हणाले, योग्य भूमिका महाविकास आघाडी सरकारने कधीच मांडलेली नाही. जी कार्यवाही करायला हवी होती, ती सुद्धा केलेली नाही. हा संपूर्ण निकाल आम्ही समजून घेऊ आणि त्यानंतर पुढील भूमिका मांडू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

राज्यात 15 महापालिकांच्या निवडणुका अपेक्षित

राज्य सरकारने डिसेंबर 2022 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात वेळ मागितला होता. पण, न्यायालयानं वेळ देण्यास नकार दिला. पावसाळ्याचे कारण राज्य सरकारनं समोर केलं. पण, आता पुन्हा मुदत वाढविता येणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. राज्यात 15 महापालिकांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला या महापालिकांचा समावेश आहे.

कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन
कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांन.
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले.
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.